मुंबई : महाशिवरात्री हा हिंदुसाठी मोठा सण आहे. पूर्ण भारतात हा मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास धरतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी भक्‍त शिवलिंगवर जल आणि दुधाने अभिषेक करतात. या दिवशी शिव आणि देवी पार्वती यांच्या शुभ-विवाह झाला होता. शिवरात्री भारतासह इतर अनेक देशांमध्ये देखील साजरा केला जातो.


ही कामे करु नका


१. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव यांना जर प्रसन्न करु इच्छिता तर काळे कपडे नका घालू. भगवान शिव यांना हा रंग पंसद नसल्याचं पुराणात म्हटलं आहे.


२. भगवान शिव यांना पांढरं फूल आवडतं. पण केवड्याचं फूल पांढरं असलं तरी ते भोलेनाथला नाही अर्पण करत.


३. शिवच्या पूजेत तीळ नाही चढवलं जात. तीळ भगवान विष्णूंच्या मळापासून बनल्याचं पुराणात म्हटलंय. त्यामुळे ते भोलेनाथांवर नाही चढवलं जात.


४. भगवान शिवच्या पूजेसाठी तुकडा तांदुळ नाही वापरला जात. शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर नारळाचं पाणी नाही चढवलं जात.


५. हळद आणि कुमकुम हे उत्पत्तीचं प्रतिक आहे. यासाठी पूजनामध्ये याचा वापर नाही केला जात. बिल्व पत्राचे तीनही पाने पूर्ण असले पाहिजेत.