मुंबई : प्रत्येत जण प्रसिद्ध आणि पैसे मिळवण्यासाठी कष्ट आणि मेहनत करत असतो. मात्र अपार कष्ट करूनही अनेकवेळा पात्रता असूनही लोकांचे स्वप्न पूर्ण होत नाही. चाणक्य नीतीमध्ये यामागे काही कारणे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की, एखादी व्यक्ती अशा काही चुका करते, ज्यामुळे त्याच्या यशाच्या मार्गात अडथळे येतात. या चुका त्याला यशस्वी होऊ देत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीवनात 'या' तीन गोष्टी करत असाल तर थांबा...
व्यसन : अंमली पदार्थांचे व्यसन माणसाला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्याचे खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य उद्ध्वस्त होते. जे तरुण वयातच अंमली पदार्थ घेण्यास सुरुवात करतात, ते आयुष्यात खूप मागे राहतात. ते पैसे आणि नाव कमवू शकत नाहीत.


आळस: आळस ही खूप वाईट गोष्ट आहे  जेव्हा माणूस पूर्ण उर्जेने काम करतो आणि आपले भविष्य चांगले करण्यासाठी रात्रंदिवस एक करतो. तर आळशीपणाने तो त्याच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा काळ गमावतो आणि नंतर त्याला आयुष्यभर पश्चाताप होतो.


वाईट संगत: तुम्ही वाईट संगतीत आहात, तर तुमची प्रगची कधीही होवू शकत नाही. तारुण्याचा यशस्वी लोकांचा हात धराल तर तुम्ही देखील त्यांच्याप्रमाणे यशाची पायरी चढाल. जर तुम्ही वाईट संगतीत असाल, तर तुम्ही जीवनात कधीही प्रगती करू शकत नाही. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)