Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांची अगदी दणक्यात सुरुवात झाली आहे. या मंगलपर्वाचा आनंद घेत असताना नकळत आपण आपल्या आप्तजनांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे एकमेकांना भेटवस्तू देणं. पण, तिथंही काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे. कारण, बऱ्याचदा आपण उत्साहाच्या भरात अशा काही भेटवस्तू देतो ज्या खरंतर न देणं अपेक्षित असतं. आता त्या वस्तू कोणत्या, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा दिवाळीला नकळतच आपण दिलेल्या भेटवस्तूंचा विचित्र परिणआम होताना दिसतो. कधीकधी असं होतं की त्या भेटवस्तू देण्यानं तुमच्या नशीबाची उलट फेरी सुरु होते. यंदाच्या दिवाळीला तुम्ही किमान या चुका करु नका. म्हणजे तुम्ही भाग्योदयाला मुकणार नाही. (Dont give glass iron things as a Diwali 2022 gift)


काचेच्या वस्तू- दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही कुणाला काचेच्या वस्तू भेटवस्तू देऊ नका. काच तुटणं फार अशुभ मानलं जातं. शिवाय यामुळे इजा होण्याचाही धोका असतो. काच तुटल्यानं पत्रिकेतील चंद्राच्या स्थितीवरही परिणाम होतो. (Glass gifts)


लोखंडाची भांडी- लोखंडाचा संबंध राहूशी असतो. त्यामुळं दिवाळीच्या दिवसांत लोखंडाची भांडी देऊ नयेत. असं केल्यास तुमचा भाग्योदय टळेल. आर्थिक अडचणी येतील.


लक्ष्मी असलेलं चांदीचं नाणं- दिवाळीला सहसा चांदीच्या वस्तू भेट स्वरुपात दिल्या जातात. पण, असं करणं योग्य नाही. कारण, असं केल्यास नशिबाचा उलट फेरा सुरु होतो. (laxmipujan)


चप्पल- बूट- दिवाळीच्या दिवसांमध्ये चपला आणि बूट भेट स्वरुपात देऊ नका. असं केल्यास गोष्टी बिघडतात. नात्यांमध्ये कटूता येते.


रुमाल आणि अत्तर- या वस्तू दिल्यास पत्रिकेतील शुक्र कमकुवत होतो. शुक्र संसारातील प्रेम, भौतिक सुख आणि सुविधांचा कारक आहे. त्यामुळं त्याची अवकृपा चांगली नाही.


देवाचे फोटो किंवा मूर्ती- सणासुदीला सहसा देवाचे फोटो किंवा मूर्ती देण्याची प्रथा आहे. पण, असं करु नये. देवाच्या मूर्ती किंवा फोटो कायम स्वत: खरेदी करावेत.


(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)