मुंबई : कामावरून थकून भागून घरी आल्यानंतर थोडी विश्रांती घ्यावी, आपल्या जोडीदाराशी प्रेमाच्या दोन चार गोष्टी बोलाव्या, गप्पागोष्टी कराव्या, तिला समजून घेण्यासाठी वेळ द्यावा आणि निवांत झोपावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदा बेडरुमध्ये गेलात की शांतपणे झोपावं असं प्रत्येकाला वाटतं असतं. पण, तुमची झोप पूर्ण होत नसेल तर... जोडीदारासोबत पटत नसेल तर तुमच्या बेडरूमधील ही वस्तू असेल तर ती हटवणं गरजेचं आहे. 


बेडरुममध्ये जोडीदारासोबत एकांत हवा असेल तर तेथे टी.व्ही. ठेवू नये असे शास्त्र सांगते. यासोबतच बेडरुममध्ये आरसा ठेवू नये असे सांगण्यात येते. टि.व्ही.च्या विद्युतशक्तीमधून जीवनशक्ती परावर्तीत होत असते. आरशामुळे ती जीवनशक्ती टि.व्ही. स्क्रीनवर आदळते झळकते आणि ती शून्य अंशात परावर्तीत होते. यामुळे तुमची झोपमोड होऊन गाढ निद्रेत व्यत्यय येणे संभवते.


त्याचप्रमाणे टि.व्ही.वरील वाटेल तेव्हा चालू असलेले कार्यक्रम पाहण्यात तुमचा वेळ खर्च होईल. शयनगृहात तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असणे आवश्यक आहे. अशावेळी टि.व्ही. मुळे तुमचे मन अशांत बनते. जर आपल्या बेडरूममध्ये टि.व्ही. असेल तर तो १५/२० दिवसांसाठी बाहेरच्या खोलीत ठेवून स्वतः याचा अनुभव घ्या. 


जर चांगला फायदा मिळाला तर टि.व्ही. कायमचाच बेडरूमबाहेर ठेवावा हेच चांगले. त्यामुळे दिवसभर परिश्रम केल्यानंतर शांती प्राप्त व्हावी आणि चांगली झोप यावी या दृष्टीने झोपण्याच्या खोलीत टी. व्ही. ठेऊ नये असे शास्त्र सांगते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)