Red Tilak Tips: `या` व्यक्तींनी चुकूनही लावू नका लाल टिळा, कारण...
कपाळावर लाल टीळा लावत असाल तर सावधान... अडचणी सोडणार नाही पाठ
Red Tilak Tips: कोणतंही शुभ कार्य असेल तर हिंदू धर्मात लाल टिळा प्रचंड महत्त्वाचा असतो. घरात देवाऱ्हातील देव-देवतांना देखील लाल टिळा लावण्यात येतो. एवढंच नाही तर, कपाळावर टिळक (tilak) लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते अशी मान्यता देखील आहे. भारतात गोपीचंदन, सिंदूर, चंदन आणि भस्म असे अनेक प्रकारचे टिळक आहेत. (tilak tulsi)
टिळा लावल्याने व्यक्तिमत्व शुद्ध होतं. पण लाल रंगाचा टिळ सर्वांसाठी शुभ आहे असं नाही. त्यामुळे आज जाणून घेवू कोणी लाल रंगाचा टिळा लावू नये. (how to apply tilak)
'या' लोकांसाठी लाल टिळा अत्यंत शुभ
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा वृश्चिक आणि मेष राशीचा स्वामी आहे. या लोकांसाठी लाल रंग शुभ मानला जातो. परंतु या राशींच्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दुर्बल किंवा अशुभ असेल तर त्यांनी लाल टिळा लावणं टाळावं. या लोकांना लाल रंगाचे शुभ परिणाम मिळत नाहीत.
'या' लोकांसाठी लाल टिळा अत्यंत अशुभ
ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि मंगळ हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. शनीला लाल रंग अजिबात आवडत नसून काळा रंग शनीचा आवडता रंग आहे. (how to apply tilak on forehead)
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि आहे. त्यामुळे लाल रंग या लोकांना अजिबात शुभ नाही. या राशींच्या व्यक्तींनी लाल रंगाचे कपडे आणि टिळा लावू नये.. असं देखील सांगितलं जातं. (tilak varma)
(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे..झी २४ तास याची खातरजमा करत नाही)