मुंबई : वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे, शुक्र ग्रह तूळ राशीत प्रवेश केल्यामुळे दुहेरी महापुरुष राजयोग निर्माण झालाय. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला वैभव, संपत्ती, ऐश्वर्य आणि भौतिक सुखाचा दाता म्हटलंय. त्यामुळे शुक्राचं संक्रमण अनेक राशींवर परिणाम करतं. यामध्ये 3 राशी अशा आहेत, ज्यासाठी शुक्राचे संक्रमण करिअर आणि पैशाच्या बाबतीत फायदेशीर ठरतं. पाहूया या 3 राशी कोणत्या आहेत.


मेष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्राचं संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीत एक दुर्बल राजयोग देखील आहे. दुसरीकडे, शुक्र मूळ त्रिकोण राशीमध्ये आहे. शुक्र ग्रह संपत्तीचा स्वामी असून राजयोग निर्माण करून स्थित आहे. यावेळी तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. करिअरमध्ये नवीन मार्ग खुले होतील. नशीब तुमच्या सोबत असू शकतं. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवी आणि मोठी जबाबदारी मिळू शकते.


मिथुन 


या राशीच्या व्यक्तींसाठी दुहेरी राजयोग तयार असल्याने चांगला पैसा मिळू शकतो. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. तसंच तुम्ही गाडी आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. त्याचबरोबर कोर्ट केसेसमध्येही तुम्हाला यश मिळू शकतं. 


कर्क


तुमच्या संक्रमण कुंडलीत शशा आणि मालव्य नावाचे राजयोग तयार होतो. त्यामुळे, जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसंच, तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. त्याच वेळी, तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.


(Disclaimer:येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)