Shani Guru Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो. राहू आणि गुरुच्या राशीतील बदलाचा सर्व राशींच्या लोकांवर खोल प्रभाव पडतो. सध्या राहू मीन राशीत असून देवगुरु गुरु सध्या मेष राशीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 एप्रिलपर्यंत शनिदेव राहूच्या नक्षत्र शताभिषा नक्षत्रात विराजमान असेल आणि त्यानंतर गुरूच्या नक्षत्रात पूर्वा भद्रामध्ये प्रवेश कऱणार आहे. अशा परिस्थितीत शनी आणि गुरूचे हे दुहेरी गोचर दुहेरी परिणाम देणार आहे. जाणून घेऊया शनी आणि गुरुच्या दुहेरी गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना होणार आहे. 


मिथुन रास 


मिथुन राशीत शनी भाग्याच्या घरात, राहू कर्माच्या घरात आणि देवगुरु गुरु लाभाच्या घरात स्थित आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक बळ मिळेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमची निर्णयक्षमता वाढणार आहे. नवीन काम सुरू कराल त्यात तुम्हाला फायदा होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. 


सिंह रास 


सिंह राशीच्या नवव्या भावात म्हणजेच नशीबाच्या घरामध्ये गुरु आणि शनीची दृष्टी पडतेय. अशा स्थितीत नशिबाने साथ दिली तर तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. भविष्याशी संबंधित निर्णय घेणं सोपं जाणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी नोकरी मिळू शकते. धार्मिक कार्यक्रमातही सहभागी व्हाल. तुमच्या जीवनावर खूप सकारात्मक प्रभाव पडेल. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल.


धनु रास 


धनु राशीच्या कुंडलीत गुरु पाचव्या भावात स्थित असून ३० एप्रिलपर्यंत या ठिकाणी राहणार आहे. त्याच्या प्रभावामुळे मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्यातूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायात निर्माण होणारी कोणतीही समस्या आपोआप सुटणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )