मुंबई : रात्री शांत झोप लागली अशी रात्र फार कमीवेळा येते. बऱ्याचदा आपल्याला चित्र-विचित्र स्वप्न पडतात आणि त्याचे अर्थ आपण शोधत राहातो. आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडतात. कधी आनंद देणारी तर कधी ऊर्जा निर्माण करणारी तर कधीकधी रहस्यमयी स्वप्न पडतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक स्वप्नमागे एक खास कारण दडलेलं असतं. टिक टॉक एक्सपर्ट ElectraSoul444  यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काही स्वप्न आणि त्यामागचे दडलेले अर्थ आज जाणून घेऊया. 


काहीतरी पडताना दिसत
ElectraSoul444 यांच्या म्हणण्यानुसार काही लोकांना स्वप्नात पडत असल्याचं दिसतं. अशा लोकांनी निर्णय घेताना आपलं मन पक्क करावं. कुठेही डगमगणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्याला अजून सक्षम बनण्याची गरज आहे आणि हिम्मत सोडू नका असंही या स्वप्नातून सांगण्याचा हेतू आहे. 


स्वप्नात दात पडताना दिसणं
तुम्हाला जर स्वप्नात तुमचे दात पडताना दिसले तर याचा अर्थ समजा की तुम्ही कोणत्यातरी चिंतेत आहात. तुम्ही त्याला खूप जास्त विचार करत आहात. तुम्ही स्वत:ला कमकुवत आणि असुरक्षित समजत आहात. आत्मविश्वास कमी होत असून तणाव वाढत असल्याची जाणीव तुम्हाला होईल.


स्वप्नात अपहरण करताना दिसलं तर...
ElectraSoul444 यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला स्वप्नात अपहरण करताना दिसलं तर त्याचा अर्थ तुमच्या मनात दबल्यासारखी भावना आहे. तुमच्यावर कोणाचातरी दबाव आहे. ज्याला तुम्ही दरवेळी झुकत आहात. तुमची क्रिएटिव्हिटी आणि प्रतिभा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. 


पाठलाग करणारं स्वप्न
तुम्हाला जर पाठलाग करणारं स्वप्न पडलं तर समजा की तुमच्यामध्ये असं काहीतरी खास आहे जे तुम्हाला अजूनही माहिती नाही. त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. जर ती गोष्ट वाईट किंवा भीतीदायक असेल तर त्यावर काहीतरी लवकरात लवकर करायला हवं.