Ketu Gochar 2023: ज्योतिषशास्त्रात ग्रहांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. राहुप्रमाणेच केतूलाही एक मायावी ग्रह म्हटलं जातं. इतर ग्रहांप्रमाणे राहू आणि केतू देखील गोचर करतात. केतू 30 ऑक्टोबर 2023 रोजी तूळ रास सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यावेळी केतू आणि मंगळ यांची युती होणार आहे. मंगळ-केतूचा हा संयोग काही लोकांसाठी शुभ ठरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन ग्रहांचा संयोग होतो आणि या युतीचा परिणाम अनेक राशींवर होताना दिसतो. असंच मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह अग्निमय मानले जातात. या दोघांचे एकत्र येणे शुभ मानलं जात नाही. केतू आणि मंगळ या ग्रहांची युती काही राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना ही युती नकारात्मक परिणाम देणार आहे. 


वृषभ रास (Taurus)


या राशीच्या लोकांसाठी केतू पाचव्या घरात प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि केतूचा संयोग शुभ ठरणार नाही. या युतीच्या प्रभावामुळे तुम्हाला अभ्यासात आणि कामात अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. रिलेशनशिपमध्ये तुम्हाला फसवणुकीचेही बळी व्हावे लागू शकते. तुम्हाला मित्रांकडूनही त्रास होऊ शकतो. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो. व्यवसायात नुकसानही होऊ शकते. 


मिथुन रास (Gemini) 


या राशीच्या लोकांसाठी मंगळ-केतूचा संयोग शुभ नसणार आहे. ही युती तुमच्या आईच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. तुम्हाला काही प्रकारच्या मानसिक छळातून जावं लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला कुठूनही पाठिंबा मिळणार नाही. वाहन चालवताना काळजी घ्यावी. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे.


कन्या रास ( Virgo )


केतूच्या या संक्रमणामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. मंगळ आणि केतू यांच्या संयोगामुळे तुमचं व्यापारात मोठं नुकसान होऊ शकतं. धनहानी होण्याचे संकेत आहेत. एखादा मोठा प्रकल्प तुमच्या हातून निसटू शकतो. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनातही तुमचा तणाव वाढू शकतो. या काळात अपघात होण्याची शक्यता निर्माण होतेय.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )