Three Rajyog In Dussehra: ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचा विजयादशमीचा सण अतिशय खास मानला जातो. दरम्यान यंदाच्या वर्षी एकीकडे दसरा पंचकमध्ये येताना दिसतोय. तर दुसरीकडे दुर्मिळ संयोग निर्माण होतोय. या दिवशी शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत असावा. जिथे तो शश राजयोग तयार होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे गुरू आणि शुक्र समोरासमोर असल्याने समसप्तक योग दृष्टीच्या धन योग तयार होतोय. यासोबतच तूळ राशीमध्ये सूर्य आणि बुधाचा संयोग होत असून यामुळे बुधादित्य योग तयार होतोय. हे असे अनेक शुभ योग एकत्रित तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ मिळू शकणार आहे. चला जाणून घेऊया दसऱ्यामध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.


कर्क रास (Cancer Zodiac)


कर्क राशीच्या लोकांना या शुभ योगांमुळे विशेष लाभ मिळू शकणार आहे. व्यवसायातील गुंतवणूक सातत्यपूर्ण नफ्यासह फायदेशीर ठरू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. यासोबतच व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. ऑफिसमध्ये तुमची ओळख होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत यशस्वी होण्याची शक्यता आहे.


तूळ रास (Libra Zodiac)


बुधादित्य योग तूळ राशीतच तयार होत असल्याने या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना शश आणि धन योगाचे अधिक फळ मिळणार आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नोकरदार लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांमध्येही सुधारणा दिसू लागतील. वैवाहिक जीवनातही आनंद राहणार आहे. या राशीच्या लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल.


कुंभ रास (Aquarius Zodiac)


या राशीत शनि असल्याने दसऱ्याच्या दिवशी इतर दुर्मिळ योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात नशीब पूर्ण साथ देणार आहे. व्यावसायिक आहेत त्यांना यावेळी आर्थिक फायदा होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्ही अधिकाधिक पैसे कमवू शकाल. तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )