Ekadashi 2024 : अपरा एकादशी 2 की 3 जून कधी आहे? संपत्ती वाढीसाठी करा `हे` उपाय
Apara Ekadashi 2024 : वैशाख कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असं म्हणतात. सुख - सौभाग्य आणि धनसंपदा वाढीसाठी अपरा एकदशीला विशेष महत्त्व आहे. 2 की 3 जून कधी आहे एकादशी जाणून घ्या योग्य तिथी.
Apara Ekadashi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सण आणि उत्सव देवतांना समर्पित आहे. वैशाख कृष्ण पक्षातील दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी एकादशी तिथी असते. वैशाख कृष्ण पक्षातील अपरा एकादशी असं म्हणतात. एकादशीच व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशीचं व्रत केल्यास पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. तर एकादशी कधी आहे याबद्दल भक्तांमध्ये संभ्रम आहे. अपरा एकादशीची योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त आणि योग जाणून घ्या.
कधी आहे अपरा एकादशी ?
ज्योतिषांच्या मते, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 02 जूनला पहाटे 05:41 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 3 जूनला पहाटे 02:41 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीपासून 02 जूनला अपरा एकादशी साजरी करण्यात येणार आहे.
अपरा एकादशी शुभ मुहूर्त आणि योग!
पंचांगानुसार अपरा एकादशीला आयुष्मान योग, सौभाग्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र शुभ संयोग असणार आहे. सकाळी 5 वाजून 23 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 12 मिनिटांपर्यंत आयुष्मान योगात पूजा करणं लाभदायक मानली जाते. तर एकादशीचं व्रत तुम्ही 3 जून 2024 ला सकाळी 08:05 ते 08:10 वाजेपर्यंत सोडू शकणार आहात.
अपरा एकादशीला धनवृद्धीसाठी करा 'हे' उपाय!
ज्योतिषशास्त्रानुसार अपरा एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी काही खास उपाय सांगण्यात आलं.
1. या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा.
2. एकादशीला तुळशीजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा जप करा. त्यानंतर तुळशीच्या मातीचा तिलक लावा.
3. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा.
4. यादिवशी शंख दुधाने भरुन त्याने विष्णूच्या मूर्तीला अभिषेक करुन पंचामृत अर्पण करा.
5. भगवान विष्णूला तुळशीचं पान असलेली खीर अर्पण करा.
6. गरजू लोकांना अन्न आणि फळे दान करा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)