Shukra Gochar : शुक्राचा सिंह राशीत प्रवेश ठरणार धोकादायक; `या` राशींना भासणार पैशाची चणचण
Shukra Gochar in Singh Rashi: येत्या 2 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडताना दिसतो.
Shukra Gochar in Singh Rashi: येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. येत्या 2 ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडताना दिसतो.
पुढच्या महिन्यात शुक्र 2 तारखेला सकाळी 12:43 वाजता सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 3 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. शुक्राच्या राशीत बदलामुळे काही राशींना प्रचंड यश आणि आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना अधिक सावध राहणार आहे. शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करत असताना कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे, ते पाहुयात.
कर्क रास (Kark Zodiac)
या राशीत शुक्राच्या गोचरमुळे लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कामाशी संबंधित कोणत्याही विषयावर तणाव वाढू शकतो. अनावश्यक खर्चामुळे त्रस्त राहू शकता. थोडं विचार करून कोणतंही काम करावं लागणार आहे. नात्यात तणावही असू शकतो. व्यवसायातही काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत बचत करणे खूप कठीण आहे. कुटुंबियांसोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो.
मकर रास (Makar Zodiac)
शुक्राच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांच्या नोकरीत काही चढ-उतार होऊ शकतात. बिझनेसबाबत काही समस्या उद्भवू शकतात. व्यवसायातील भागीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन देखील थोडे कठीण असू शकते.
मीन रास (Meen Zodiac)
शुक्राच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. पाठीचा कणा आणि पाठीशी संबंधित समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. घर किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. यामुळे तुमचेच नुकसान होऊ शकते. कामाच्य ठिकाणी इतर लोकं तुम्हाला त्रास देऊ शकतात. मित्रांसोबत वाद होऊ शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )