प्रत्येक स्वप्नांचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो, तुमच्या स्वप्नांचे शुभ-अशुभ संकेत जाणून घ्या
जरी स्वप्नांवर अनेक प्रकारचे संशोधन केले गेले असले, तरी स्वप्न विज्ञान मानते की, आपण जे काही स्वप्न पाहतो त्याचा काहीतरी अर्थ असतो.
मुंबई : आपण बऱ्याचदा गाढ झोपेत असलो की, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात. हे स्वप्न कधी आपल्याला आठवतात, तर कधी आपण स्वप्न विसरुन जातो. तुम्ही जर नीट विचार केलात तर तुम्हाला हे जाणवेल की, आपल्याला पडलेले स्वप्न हे बऱ्याचदा असे स्वप्न असतात, ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. ज्यामुळे आपण विचार करत बसतो की मला हे स्वप्न का पडलं असावं? आणि त्याचं उत्तर शोधत बसतो.
स्वप्नांशी संबंधित अनेक गोष्टी आणि त्यांचे वर्णन शास्त्रात करण्यात आले आहे. जरी स्वप्नांवर अनेक प्रकारचे संशोधन केले गेले असले, तरी स्वप्न विज्ञान मानते की, आपण जे काही स्वप्न पाहतो त्याचा काहीतरी अर्थ असतो. असे म्हणतात की, स्वप्नांमध्ये आपल्याला भविष्याबद्दल सावध करण्याचे अनेक संकेत दिले जातात.
आपण अनेकदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल रडत असतो, पण आपण कधी स्वप्नात स्वत:ला रडताना पाहण्याचा अनुभव घेतला आहे का? किंवा एखाद्या लहान मुलाला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला रडताना पाहिले आहे?
जर एखाद्या व्यक्तीला असे स्वप्न दिसले, तर त्याच्या मनात विचार येतो की, आपले काहीतरी वाईट होणार आहे का?
परंतु शास्त्र सांगते की, स्वप्नात रडताना दिसणे हे वास्तवात शुभ संकेत मानले जातात. जेव्हा एखाद्याला त्याच्या स्वप्नात संकटांना सामोरे जावे लागते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की, त्यांच्या जीवनात प्रत्यक्षात काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे.
स्वप्नात स्वतःला रडताना पाहणे
स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात स्वत:ला रडताना दिसले, तर ते खूप शुभ लक्षण आहे. हे स्वप्न आपल्याला सूचित करते की, आपली आर्थिक स्थिती मजबूत आहे. म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे. लवकरच तुमची परिस्थिती तुमच्या अनुकूल होणार आहे.
जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात रडताना दिसले तर स्वप्न शास्त्रानुसार हे वास्तविक जीवनात तुमचा आदर वाढवण्याचे लक्षण आहे. या स्वप्नानुसार लवकरच समाजात तुमचा आदर वाढेल असे म्हणता येईल.
स्वप्नात लहान मुलाला रडताना पाहाणे
अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला स्वप्नात लहान मूलही रडताना दिसतात. अशी स्वप्ने सूचित करतात की, लवकरच तुमच्या आयुष्यात काही संकट कोसळणार आहे.
दुसर्याला रडताना पाहाणे
कधी कधी स्वप्नात दिसते की, कोपऱ्यात बसून कोणीतरी हळूच रडत आहे. अशी स्वप्ने खूप भयानक असतात, परंतु वास्तविक जीवनात ती तुमच्यासाठी शुभ चिन्हे घेऊन येतात. स्वप्न शास्त्रानुसार येणारा काळ तुमच्यासाठी शांततेचा असेल, त्याचप्रमाणे असे स्वप्न पाहणाऱ्यांचे सर्व टेन्शनही येणाऱ्या काळात संपतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)