Nazar Dosh Upay : आपण लहानपणापासून पाहिलं आहे. लहान बाळाला काळा टिका लावला जातो. त्याचा हाता पायात काळा धागा बांधला जातो. त्याच मागचं कारण असतं ते त्याला कोणाची वाईट नजर लागू नये. घरात एखादी आनंदाची बातमी असल्यास ती सगळ्यांना सांगू नको, अशी वाक्य पण आपण ऐकली आहेत. कारण आनंदाला नजर लागेल. सुंदर दिसल्यास लगचेच काळा टीका लावला जातो. आज सोशल मीडियाच्या जमाना आहे अशात अनेक जण आपल्या आयुष्यातील गोष्टी, घटना किंवा त्या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अशात घरची मंडळी कायम ओरडतं असतात, असं प्रत्येक गोष्ट जग जाहीर करु नकोस. लोकांच्या नजरा काही चांगल्या नसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग आता कसं ओळखायचं की आपल्याला वाईट नजर लागली आहे. तर आज आपण त्याची लक्षण आणि उपाय यावर बोलणार आहोत. वाईट नजर म्हणजे आपल्या आयुष्यात नकारात्मकता वाढते. त्यामुळे आपली अनेक कामं खोळंबतात. आपल्यामध्ये उत्साह राहत नाही, सकारात्मक उर्जा कमी होते. तो व्यक्ती आजारी पडतो किंवा त्याला सतत थकल्यासारखं वाटतं.  आयुष्यात अनिष्ट घटना घडू लागतात. (evil eye signs and How to Overcome Effects of Evil Eye Buri Nazar Remedies astrological tips marathi news)


नजर लागल्याची लक्षणं


वाईट स्वप्न पडणे


जर तुम्ही कुठल्या समारंभाला किंवा कार्यक्रमाला गेले असाल आणि तिथे तुमचं खूप कौतुक झालं असेल. त्यानंतर अनेक दिवस तुम्हाला रात्री रोज वाईट स्वप्न पडतं असतील, तर तुम्हाला वाईट नजर लागली आहे, असं शास्त्रात सांगितलं आहे. 


आजारी असल्याचं जाणवतं


अनेकांना सतत थकल्यासारखं, दिवसभर मरगळ वाटणे अगदी सतत झोपावसं वाटणे, काही करण्याची ताकद नसणे म्हणजे तुम्हाला नजर लागली आहे असं समजलं जातं.


तुळशीचं रोप खराब होणे


अचानक घरातील तुळस खराब होते अशावेळी घराला किंवा घरातील व्यक्तीवर वाईट नजरचा प्रभाव आहे असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. 



अचानक अस्वस्थ वाटणे


अनेक जणांना अचानक अस्वस्थ शिवाय घाबरल्यासारख वाटतं. अगदी अनेक गोष्टी करताना डिस्कंफर्ट वाटतं. अशावेळी तुम्हाला नजर लागली आहे, असं म्हणतात. 



या लोकांना लगचेच नजर लागते


ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राशीचा स्वामी आणि चंद्र राहुने त्रस्त आहे, अशा लोकांना लगचेच नजर लागते. त्यामुळे अशा लोकांनी राहुचा अशुभ प्रभाव करण्यासाठी उपाय केले पाहिजे. 


हे उपाय करा


बुधवारच्या दिवशी सप्त धान्य म्हणजेच सात प्रकारच्या धान्यांचं दान करावं. 


घरात राहु यंत्राची स्थापना करावी. यामुळे वाईट नजर आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवते शिवाय राहूचा शुभ परिणाम दिसून येतो. 


ज्या लोकांना वारंवार नजर लागण्याची समस्या असेल त्या लोकांनी नऊमुखी रुद्राक्ष धारण करावे. 


हेही करा 


भैरव मंदिरातील काळा धागा गळ्यात किंवा हातात बांधावा. 


पंचमुखी हनुमानाचे लॉकेट घालू शकता. 


हनुमानाच्या मंदिरात जाऊन देवाचा सिंदूर कपाळावर लावावा. 



वाईट नजरेपासून ताबडतोब मुक्त होण्यासाठी एका चपाती बनवा ती एका बाजूने कच्ची ठेवा. नंतर त्या चपातीच्या भाजलेल्या भागाला तेल, लाल तिखट आणि मीठ लावा. नंतर ही चपाती नजर लागलेल्या व्यक्ती अंगावरुन 7 वेळा फिरवा आणि नंतर ती रस्त्यावर चौकात ठेवा. 


लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचविण्यासाठी त्यांना मोती चांदचं लॉकेट घाला.


जर लहान मुलं दूध पित नसेल तर त्याचा अंगावरुन दूध उतरवून ते कुत्र्याला द्यावे. 


याशिवाय दोन लाल सुखी मिर्ची, सेंधा मिठ, थोडी राईचे दाणे घ्या. या सगळ्यांना एकत्र करुन नजर लागलेल्या व्यक्तीवरुन तीन वेळा मागून पुढून अंगावरुन फिरव्या. त्यानंतर त्या गोष्टी आगीत टाका. असं केल्यास नजर उतरवली जाते असं शास्त्रात सांगितलं आहे. 



(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)