मुंबई : यंदाच्या वर्षातील म्हणजे 2022 मधील पहिला ग्रहण काही दिवसांनंतर आहे. 30 एप्रिल रोजी पहिलं सूर्यग्रहण दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही. पण ज्योतिषशास्त्रानुसार आंशिक सूर्यग्रहण झाल्यानंतरही त्याचा सर्व राशींवर प्रभाव पडतो. हे ग्रहण दक्षिण अमेरिका, दक्षिण प्रशांत महासागर इत्यादी ठिकाणी दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 एप्रिल 2022 रोजी  सूर्यग्रहण वृषभ राशीत असेल. सूर्यग्रहणानंतर 15 दिवसांनी म्हणजे 15 मे रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहणही होणार आहे. हा काळ 3 राशींसाठी अतिशय शुभ आहे.


वृषभ - या राशीत वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. याकाळात करिअरमध्ये प्रगती देईल. व्यवसायिकांना मोठा फायदा होईल. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. अशी एखादी शुभ घटना घडेल, जी तुमचे आयुष्य बदलून टाकेल.


सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी अचानक धनलाभ होईल. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पदोन्नती-वाढ होईल. तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होईल.


धनु- धनू राशींच्या व्यक्तींना नवी संधी मिळेल. नवी नोकरी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. एवढंच नाही तर रखडलेली कामं देखील पूर्ण होतील.


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)