Dreams Interpretation: पृथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वप्न ही पडतात. स्वप्नांचं एक वेगळंच जग असतं. गाढ झोपेत असताना आपण एका अद्भुत जगात वावरतो. काही स्वप्न आनंददायी, तर काही स्वप्न पाहून खूप वेदना होतात. तुम्ही कधी स्वप्न शास्त्राबाबत (Dreams Interpretation) जाणून घेतलं आहे का? झोपेत असताना पडलेली स्वप्न आपल्या जीवनाशी निगडीत असतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका असं सांगितलं जातं. अशीच काही कॉमन स्वप्न ज्यामुळे दचकून जागं होतो. चला तर त्याबाबत जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्नात तुमचा जोडीदार तुमची फसवणूक करत असेल तर नात्याबाबत संकेत असतात. तुमच्यासाठी चिंतेचे कारण असू शकते. असं स्वप्न पडणे वास्तविक जीवनात आपल्या नातेसंबंधातील विश्वासाची कमतरता दर्शवते. तुमच्या दोघांमध्ये एखादी तिसरी व्यक्ती हस्तक्षेप करत असल्याने असं स्वप्न पडतं.दुसरीकडे, तुम्हाला स्वप्नात पैसा दिसत असेल तर त्याचा अर्थ जाणून आश्चर्य वाटेल. याचा अर्थ तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचे आहे, असा होतो. इतकंच काय तर सत्ता मिळवण्याची इच्छा तुमच्या मनात असते.


स्वप्नात देवाचं दर्शन मिळणं शुभ मानले जाते. सर्वांच्या नशिबी असं स्वप्न नसतं असं म्हणता येईल. संकटात सापडलेल्या व्यक्तीला असं स्वप्न पडलं तर याचा अर्थ असा होतो की अशा परिस्थितीत तुम्ही धीर धरावा. जर तुम्ही स्वप्नात स्वतःला उडताना पाहिले असेल तर दोन अर्थ असू शकतात. जर उड्डाणावेळी आनंदी असाल तर तुमच्या आयुष्यात येणार्‍या अनुभवासाठी तुम्ही उत्साहित आहात. दुसरीकडे, यावेळी भीती वाटत असेल, तर तुम्हाला नवीन अनुभव येण्याची भीती असेल.


Mangal Vakri 2022: वक्री मंगळ ग्रहामुळे राजयोग, 4 राशींना होणार फायदा


जर तुम्ही स्वप्नात शाळा पाहिली तर तुमचे जीवन आनंदाने जाणार असल्याचे संकेत मिळतात. त्याचबरोबर लवकरच यश मिळेल, असा त्याचा अर्थ असतो. या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला शाळेच्या दिवसांची आठवण येते, हे ही तितकंच खरं आहे.