Mangal Vakri In Mithun Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा गोचर आणि वक्री स्थिती महत्त्वाची असते. सध्या मंगळ ग्रह (Mangal Grah) मिथुन राशीत (Mithun Rashi) वक्री अवस्थेत आहे. मंगळ ग्रह 30 ऑक्टोबरपासून या स्थितीत आहे. यामुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. यामुळे चार राशींवर चांगला परिणाम होणार आहे. हा राजयोग चांगली फळं देईल, असं ज्योतिष्याचं म्हणणं आहे. वक्री मंगळ धन, करिअर आणि वैवाहिक जीवनात चांगली फलं देईल.
वृषभ (Vrushabh)- मंगळाची वक्री स्थिती या राशीसाठी लाभदायी ठरेल. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते. त्याचबरोबर काम करत असलेल्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. या आर्थिक गणितं झपाट्याने सुटताना दिसतील. त्यामुळे कर्जाचा डोंगर हलका होईल. असं असलं तरी पैशांचा व्यवहार जपून करावा.
कन्या (Kanya)- या राशीच्या लोकांना मंगळाची वक्री स्थिती चांगलं फळ देईल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तसेच कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पडेल. या काळात मेहनतीला पूर्ण फळ मिळेल.
सिंह (Sinha)- मंगळाच्या वक्री स्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. खर्चात कपात होईल. तसेच बचतीसह गुंतवणूक फलदायी ठरेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळेल. तसेच आरोग्यासंबंधी समस्या सुटतील.
Guru Margi 2022: 24 नोव्हेंबरला देवगुरू बृहस्पती होणार मार्गस्थ, या राशींना मिळणार फळ
कुंभ (Kumbh)- मंगळ वक्री स्थितीत असल्याने कुंभ राशीच्या लोकांना उर्जा आणि उत्साहात वाढ होईल. नोकरी व्यापाऱ्यात यश मिळेल. तसेच या काळात ओळखीमध्ये वाढ होईल. समाजात मानसन्मान वाढेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)