Bhadra Rajyog: ऑक्टोबर महिना सुरु झाला असून या महिन्यात अनेक ग्रह गोचर करणार आहेत. वैदिक ज्योतिषात बुध ग्रह तर्क, व्यवसाय, बुद्धिमत्ता, अर्थव्यवस्था, गणित, बँकिंग आणि वाणीचा कारक मानला जातो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी बुध ग्रह स्वराशी म्हणजेच कन्या राशीत प्रवेश केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यावेळी बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसतो. बुध 1 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश केला असून त्यामुळे भद्रा राजयोग तयार झाला आङे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या गोचरमुळे तयार झालेल्या भद्र राजयोग कोणत्या राशींच्या आयुष्यात अच्छे दिन घेऊन येणार आहे. 


मकर रास (Makar Zodiac)


भद्र राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. बुध ग्रहाची तुमच्या राशीचा स्वामी शनीशी मैत्रीची भावना आहे. म्हणून, यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तुमचे रखडलेले परत येण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकणार आहे. श्रीमंत होण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. काम किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता.


सिंह रास (Leo Zodiac)


सिंह राशीच्या लोकांसाठी भद्र राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि सर्व संबंध सुधारतील. तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. कौटुंबिक वातावरणही आनंददायी राहील. शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागणार आहे.


मिथुन रास (Mithun Zodiac)


भद्र राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या वेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात चांगला नफा मिळू शकतो. जे काम तुम्ही कठोर परिश्रमाने पूर्ण कराल, त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. यावेळी तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. या काळात चांगला नफा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अधिका-यांचे सकारात्मक सहकार्य मिळेल. देवाच्या आशीर्वादाने या काळात वैवाहिक जीवनात आनंद राहील.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)