Gajkesari-tirkon Rajyog : गजकेसरी, त्रिकोण राजयोग बदलणार नशीब; `या` राशींनी तिजोरीत भरणार पैसाच पैसा
Gajkesari And tirkon Rajyog August 2023: ग्रहांच्या राशीबदलामुळे तयार होणारा योग मानवी जीवनावर परिणाम करतात. ऑगस्ट महिन्यामध्ये दोन शुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये गजकेसरी आणि त्रिकोण राजयोग निर्माण होणार आहे.
Gajkesari And tirkon Rajyog August 2023: वैदिक पंचांगानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशीबदलामुळे काही शुभ योग तयार होताना दिसतात. ग्रहांच्या राशीबदलामुळे तयार होणारा योग मानवी जीवनावर परिणाम करतात.
ऑगस्ट महिन्यामध्ये दोन शुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये गजकेसरी आणि त्रिकोण राजयोग निर्माण होणार आहे. यापैकी गजकेसरी राजयोग एका महिन्यात 4 वेळा तयार होणार आहे. या राजयोगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा शुभ परिणाम मिळणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
तूळ रास
गजकेसरी राजयोग आणि त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. व्यापारी वर्गाला यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. संगीत, चित्रपट, रंगभूमीशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला असून कोर्टाच्या कोणत्याही प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने येणार आहे.
मकर रास
गजकेसरी आणि त्रिकोण राजयोग तयार झाल्याने या राशींच्या व्यक्तींसाठी शुभ सिद्ध होणार आहे. या काळात कोणतीही जमीन-मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. यासोबतच यावेळी तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. तुमची रखडलेली कामही पूर्ण होतील. सासरच्या लोकांशी चांगले संबंध निर्माण होणार आहे.
मेष रास
गजकेसरी आणि त्रिकोण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना यावेळी यश मिळू शकणार आहे. अविवाहित आहेत त्यांना या काळात जीवनसाथी मिळू शकतो. यावेळी तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होणार आहे.अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )