Gajkesari Yog In Meen Rashi In September 2022: राशीचक्रात ग्रहमंडळाचं भ्रमण सर्वात महत्त्वाचं असतं. प्रत्येक ग्रहांचं भ्रमण कालावधी वेगवेगळा असतो. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा नवग्रहांपैकी एक आहे. एका राशींतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी चंद्र ग्रहाला सव्वा दोन दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र आले तर काही शुभ आणि अशुभ योग तयार होतात. 11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 2 वाजून 23 मिनिटांनी चंद्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मीन राशीत गजकेसरी योग तयार होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीन राशीत या आधीच वर्षभरासाठी गुरु ग्रहानं आगमन केलं आहे. मीन ही गुरु ग्रहाची स्वरास आहे. त्यामुळे गुरु ग्रह स्वत:च्या राशीत आहे. तर चंद्र गोचर करत या राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे या राशीत गजकेसरी योग तयार होत आहे.11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान चंद्र गुरु ग्रहाची मीन राशीत युती होत असल्याने गजकेसरी योग तयार होत आहे. गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग मानला जातो आणि कुंडलीत तयार झालेल्या सर्व धन योगांपैकी हा सर्वात शक्तिशाली योग आहे. धनाचा कारक बृहस्पति आणि मनाचा कारक चंद्र यामुळे हा योग तयार होतो. हा योग कुंभ राशीच्या दुसऱ्या , मिथुन राशीच्या दहाव्या आणि वृषभ राशीच्या अकराव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या तीन राशींना चांगला फायदा होईल.


चंद्र 13 सप्टेंबर 2022 रोजी सकाली 6 वाजून 35 मिनिटांनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मेष राशीत ग्रहण योग तयार होणार आहे.  मेष राशीत राहु ग्रह दीड वर्षांसाठी ठाण मांडून आहे. जेव्हा चंद्र राहूच्या संयोगात येतो, तेव्हा ग्रहण योग तयार होतो, हा अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या लोकांवर त्याचे वर्चस्व असते त्यांच्या मानसिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि चंद्राच्या संबंधामुळे चंद्र दूषित होतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)