Gajlaxmi Rajyog : ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस अतिशय शुभ आहे. धन, विलास, सौंदर्य, संपती, सुख आणि प्रणय याचा कारक शुक्र (Shukra Gochar 2023) जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा याचा परिणाम 12 ही राशींवर दिसून येतो. कुंडलीतील शुक्राची ( Venus Transit 2023) स्थिती बलवान असेल तर जाचक धनवान होतो. आज शुक्र वक्री (Shukra Vakri 2023) स्थिती असल्याने गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशीच्या आयुष्यात धन, यश आणि कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. (Gajlaxmi Rajyog shukra gochar 2023 these zodiac get profit venus transit in cancer till 2 October astrology)


'या' राशींना बंपर लॉटरी!


कर्क (Cancer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांना शुक्र गोचरमुळे अतिशय लाभ होणार आहे. गजलक्ष्मी रायजोगामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. खर्च वाढणार असला तरी त्यांची बचत होणार आहे. लव्ह लाइफमधील समस्या दूर होणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचं चांगल स्थळ येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार आहे. 


कन्या (Virgo)


 शुक्र गोचरमुळे तयार झालेल्या गजलक्ष्मी राजयोगामुळे या लोकांना फायदा होणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून अमाप धनलाभ होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून तुमच्या मोठा फायदा होणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. 


मकर (Capricorn)


शुक्र वक्री स्थितीमुळे तयार झालेल्या गजलक्ष्मी राजयोगामुळे तुम्हाला धनलाभ होणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. नोकरीची उत्तम संधी चालून येणार आहे. इच्छित पगार वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे. पार्टनरशीमधून चांगला फायद्याचे संकेत आहेत. 


तूळ (Libra)


शुक्र गोचरमुळे तयार झालेल्या गजलक्ष्मी राजयोग या राशीसाठी उत्तम असणार आहे. नोकरदार वर्ग असो किंवा व्यापारी यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या कल्पनांना यश मिळणार आहे. मीडिया, मार्केटिंग, शिक्षण आणि दळणवळणाशी निगडित लोकांसाठी 2 ऑक्टोबरपर्यंत सर्वात्तम काळ असणार आहे. तुम्ही तुमच्या संवादाने लोकांना आकर्षित करु त्यातून फायदा मिळवणार आहात. 


हेसुद्धा वाचा - Kappar Yoga 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 ऑगस्टपासून 'या' राशींच्या अडचणीत वाढ! होणार आर्थिक नुकसान


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)