Ganesh Chaturthi 2022: तुमचा आमचा लाडक्या बाप्पा लवकरच आपल्या सोबत राहिला येणार आहे. त्यामुळे सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु आहे. कोरोना महासंकटानंतर म्हणजे जवळपास दोन वर्षांनंतर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात श्रीगणेशाला विशेष महत्त्वं आहे. कुठलेही शुभ कार्य करताना गणेशाची पूजाअर्चा केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतीक आहे. 31 ऑगस्टला संपूर्ण भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. श्रीगणेशाच्या जन्माबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. मात्र बाप्पाच्या जन्माची 'ही' विलक्षण कथा तुम्ही कधीच ऐकलीच नसेल, असं पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात. चला आपण पण जाणून घेऊयात गणरायाच्या जन्माची कथा. (ganesh chaturthi 2022 ganesh birthday ganesha katha trending news and you may not have heard this story of Bappa birth)


बाप्पाच्या जन्माची पहिली कथा 


वराह पुराणानुसार सांगणात आलेली कथा जाणून घेऊयात. वराह पुराणानुसार महादेव शंकराने गणेशाला पंचमहाभूतांचं रूप दिलं होतं. गणेशजींना एक विशेष आणि अतिशय सुंदर रूप मिळालं होतं. देवी-देवतांना गणेशाचं वेगळेपण कळल्यावर गणेश आकर्षणाचं केंद्र तर बनणार नाही ना, अशी भीती महादेवाला वाटू लागली. तेव्हा शिवाने गणेशाचं पोट मोठं आणि तोंड हत्तीचं केलं.अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला.


बाप्पाच्या जन्माची दुसरी कथा


शिवपुराणातही गणरायाच्या जन्माची वेगळी कथा सांगण्यात आली आहे. शिवपुराणानुसार माता पार्वतीने आपल्या अंगावर हळदीचा पुतळा लावला होता.याच हळदीच्या पुतळ्यात त्यांनी नंतर जीव ओतला. अशा प्रकारे श्रीगणेशाचा जन्म झाला. यानंतर माता पार्वतीने गणेशला दारातून कोणालाही आत येऊ देऊ नये अशी आज्ञा केली. गणेशजी दारात उभे असतानाच शिवाचे आगमन झाले. गणेशाने पिता महादेवाला ओळखले नाही. तर माता पार्वतीच्या आज्ञा म्हणून गणेशाने शिवाला आत जाण्यास नकार दिला. त्यामुळे शिव क्रोधित होऊन त्यांनी गणेशाचे डोके त्रिशूलाने कापले.


त्यानंतर पार्वती बाहेर आली आणि आक्रोश करू लागली आणि गणेशाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. तेव्हा शिवाने गरुडाला उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की, जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे, त्या बाळाचे डोके आणा. तेव्हा गरुडाने हत्तीच्या बाळाचे डोके आणले. भगवान शिवांनी ते मुलाच्या शरीराला जोडले. त्यात त्याने जीव ओतला. अशा प्रकारे गणेशाला हत्तीचे डोके मिळाले.