Ganesh Chaturthi 2023 : मंगळवारी 19 सप्टेंबरला विघ्नहर्ता (Ganeshotsav 2023), गणेशाचं आगमन घरोघरी आणि मंडपात होणार आहे. कुठे दीड दिवस तर काही जणांकडे पाच तर काही भक्तांकडे बाप्पा 10 दिवस राहायला येतो. अशावेळी घरातील लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे बाप्पाच्या सेवेत मग्न असतात. घरातील स्त्रीया या बाप्पाला त्यांच्या आवडीचे मोदक नैवेद्यात दाखवतात. बाप्पाच्या सेवेत काही कमी पडून नये अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते. (Ganesh Chaturthi 2023 Bhog Thali How to serve a traditional Marathi thaali video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा विघ्नहर्ता बाप्पा जेव्हा घरात असतो तेव्हा त्याच्या सेवेत काही चुकू नये म्हणून दश असतात. अशात बाप्पाचे नैवेद्याचे ताट कसे वाढावे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 


 बाप्पाला नैवेद्य लावताना या हे पदार्थ नक्की ताटात असावे. 


प्रत्येक भक्ताला माहिती आहे गणरायाला मोदक अतिशय प्रिय आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला बाप्पाला 21 मोदक नक्की दाखवा. काही भागात उकदीचे मोदक करण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी तळणाचे मोदक केले जातात. त्याशिवाय मोतीचूर किंवा कलाकंद ताटात ठेवल्यास बाप्पा अधिक प्रसन्न होतो. 


हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2023 : लाडक्या बाप्पाला दहा दिवस दाखवा 'हे' नैवेद्य


गणपतीला नैवेद्याचं ताट वाढताना कुठे काय वाढावे आणि रोजच्या ताटात आणि नैवेद्याचं ताटात यात काय फरक आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. या नैवेद्यातील पानातील सर्व सात्विक पदार्थ असावेत. लसूण, कांदा किंवा तिखट मसाल्यांचा वापर नैवेद्य पदार्थांमध्ये करु नयेत. 



नैवेद्य पान आणि रोजच्या ताट वाढण्याची शास्त्रीय पद्धत काय आहे, हे जाणून तुम्ही त्याचा कायम उपयोग केल्यास देवाला प्रसन्न आणि घरातील मंडळींना निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकतो. 


हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा



शिवाय बाप्पाला नैवेद्य लावताना ताट दुर्वा नक्की असावा. त्याशिवाय नवैद्य दाखविताना कुठलं मंत्र म्हणायचं हे या व्हिडीओमधून जाऊन घ्या. 



हेसुद्धा वाचा - तुमच्याही घरी होतंय बाप्पाचं आगमन? मग पूजा करताना 'या' 5 गोष्टी टाळा



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)