Ganesh Chaturthi 2024 : सोमवती अमावस्येनंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. भाद्रपद महिना म्हटला की वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. घरोघरी आणि मंडळांमध्ये गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अतिशय महत्त्व असून हा अख्खा महाराष्ट्र हा गणेशमय होतो. यंदा गणेशाचं आगमन कधी आहे, पूजा विधीसाठी शुभ मुहूर्त किती वेळ आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. (Ganesh Chaturthi 2024 dates puja timings subha muhurat significance ganpati bappa sthapana in marathi )


गणेश चतुर्थी 2024 तिथी (Ganesh Chaturthi 2024 Date)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. गणेश चतुर्थी तिथी ही 6 सप्टेंबरला दुपारी 3.01 वाजेपासून 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5.37 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा सण साजरा करायचा आहे. या दिवशी घरोघरी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा-अर्चा करण्यात येते. 


हेसुद्धा वाचा - Shravan Somvar 2024 : 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या असल्याने श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा का?


गणेश चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi Shubh Muhurat)


पंचागानुसार यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त दोन तास ३१ मिनिटे असणार आहे. गणेश चतुर्थी २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करीत पूजा करू शकता.


गणेश चतुर्थीला चार शुभ योग (Ganesh Chaturthi Shubh Yog)


गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ योग निर्माण होणार असून गणेश चतुर्थीला सकाळी ब्रह्म योग असणार आहे. जो रात्री 11 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर इंद्र योगही यादिवशी असेल. या दोन योगांव्यतिरिक्त रवि योग सकाळी 06.02 मिनिटांपासून ते दुपारी 12.34 मिनिटांपर्यंत आहे. तर सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 12.34 मिनिटांपासून 8 सप्टेंबरला सकाळी 06.03 मिनिटांपर्यंत असणार आहे. 


गणेश चतुर्ती  पूजा विधी 


घरच्या घरी पूजा करत असाल तर, ती कशी करायची त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. गणेश चतुर्थी तिथीला शुभ मुहूर्तावर बाप्पाची स्थापना घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात करावी. हे लक्षात ठेवा ऊं गं गणपतये नम: मंत्रोच्चार करत पूजा करावी. बाप्पाच्या पूर्व दिशेला कळस ठेवा आणि आग्नेय दिशेला दिवा ठेवा. आता स्वतःवर पाणी शिंपडताना ॐ पुंडरीकाक्षय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर बाप्पाला नमस्कार करून 3 वेळा पवित्र जल ग्रहन करून कपाळावर टीळा लावा. आता बाप्पावर प्रथम पाणी आणि नंतर पंचामृताचे काही थेंब टाका. आता शुद्ध पाणी शिंपडा. धातूची मूर्ती असल्यास त्याचाही अभिषेक करा. आता दिवाची पूजा करुन दिपप्रज्वलन करा. 
आता बाप्पाला जास्वंदाचं फुल, दुर्वा, जाणवं, पान सुपारी अर्पण करा. यानंतर वस्त्र, चंदन, अक्षदा, धूप, नैवेद्य आणि फळे अर्पण करा. धूप लावा. आता ऋतुफळ, सुकामेवा, मोदक किंवा इतर मिठाईचा नैवेद्य दाखवा. आता गणेशाची आरती करा, मंत्रपुष्पांजली आणि कपूर आरती करा.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )