Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाचं आगमन होणार आहे, तर भक्तीभावात कमी नाही तर पूजेचही कसुबरं पण चुक करु नका. यंदा गणेश चतुर्थीला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा साहित्य आणि पूजा विधी.
Ganesh Chaturthi 2024 Subha Muhurat : लाडक्या बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. अख्ख महाराष्ट्र गणेशमय झालंय. बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक जय्यत तयारीमध्ये व्यस्त आहेत. विघ्नहर्त्या 10 दिवस आपल्याकडे पाहुणा म्हणून येतो. त्याच्या स्वागतात आणि पाहुणचारमध्ये काही कमतरता राहिला नको आणि तो प्रसन्न मनाने आपल्या घरावरील विघ्न दूर करावी यासाठी शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि साहित्य जाणून घ्या.
गणेश चतुर्थीची तिथी (Ganesh Chaturthi Date)
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी दुपारी 12:08 वाजता सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबरला तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचे व्रत (Ganesh Chaturthi Vrat) करण्यात येणार आहे.
हेसुद्धा वाचा - GANESH UTSAV 2024 : बाप्पाला घरी आणताना 'हे' 21 नियम लक्षात ठेवा, अन्यथा...
गणेश चतुर्थीला चार शुभ योग (Ganesh Chaturthi Shubh Yog)
गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ योग निर्माण होणार असून गणेश चतुर्थीला सकाळी ब्रह्म योग असणार आहे. जो रात्री 11 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर इंद्र योगही यादिवशी असेल. या दोन योगांव्यतिरिक्त रवि योग सकाळी 06.02 मिनिटांपासून ते दुपारी 12.34 मिनिटांपर्यंत आहे. तर सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 12.34 मिनिटांपासून 8 सप्टेंबरला सकाळी 06.03 मिनिटांपर्यंत असणार आहे.
गणेश चतुर्थी प्राणप्रतिष्ठापना शुभ मुहूर्त
7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:07 वाजेपासून ते दुपारी 1:33 वाजेपर्यंत गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तादरम्यान पूजा करणे फलदायी ठरेल. पंचागानुसार यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त 2 तास 31 मिनिटं असणार आहे.
जर काही कारणाने या शुभ मुहूर्तावर गणेश स्थापना तुम्ही करु शकलात नाही तर, संध्याकाळी 5.37 वाजेपर्यंत गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करु शकता.
हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली
गणेश स्थापना पूजा साहित्य
कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी 10, खारीक 5, बदाम 5, हळकुंड 5, अक्रोड 5, ब्लाउज पीस 1, कापसाची वस्त्रे, जानवी जोड 2, पंचा 1, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार 1, आंब्याच्या डहाळे, नारळ 2, फळे 5, विड्याची पाने 25, पंचामृत, कलश 2, ताम्हण 1, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर. यापैकी बरंच सामान आपल्या घरी असतंच पण फुलं पान आणि इतर सामान बाजारातून लवकरात लवकर आणून ठेवल्यास ऐनवेळी तुमची गैरसोय होणार नाही.
गणेश चतुर्थी पूजा विधी
घरच्या घरी पूजा करत असाल तर, ती कशी करायची त्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. गणेश चतुर्थी तिथीला शुभ मुहूर्तावर बाप्पाची स्थापना घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात करावी. हे लक्षात ठेवा ऊं गं गणपतये नम: मंत्रोच्चार करत पूजा करावी. बाप्पाच्या पूर्व दिशेला कळस ठेवा आणि आग्नेय दिशेला दिवा ठेवा. आता स्वतःवर पाणी शिंपडताना ॐ पुंडरीकाक्षय नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर बाप्पाला नमस्कार करून 3 वेळा पवित्र जल ग्रहन करून कपाळावर टीळा लावा. आता बाप्पावर प्रथम पाणी आणि नंतर पंचामृताचे काही थेंब टाका. आता शुद्ध पाणी शिंपडा. धातूची मूर्ती असल्यास त्याचाही अभिषेक करा. आता दिवाची पूजा करुन दिपप्रज्वलन करा.
आता बाप्पाला जास्वंदाचं फुल, दुर्वा, जाणवं, पान सुपारी अर्पण करा. यानंतर वस्त्र, चंदन, अक्षदा, धूप, नैवेद्य आणि फळे अर्पण करा. धूप लावा. आता ऋतुफळ, सुकामेवा, मोदक किंवा इतर मिठाईचा नैवेद्य दाखवा. आता गणेशाची आरती करा, मंत्रपुष्पांजली आणि कपूर आरती करा.
गणेश मंत्र (Ganesh Mantra)
वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नम कुरू मे देव, सर्वकार्येषु सर्वदा।।
ॐ गं गणपतये नम:।
ॐ नमो हेरम्ब मद मोहित मम् संकटान निवारय-निवारय स्वाहा।
ॐ वक्रतुंडा हुं।
ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
सिद्ध लक्ष्मी मनोरहप्रियाय नमः।
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये। वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नम:।।
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )