Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाचा चेहरा झाकावा का?, घरी आणताना गणेशाचा चेहरा आपल्याबाजूने असावा? विज्ञान आणि शास्त्र सांगतं...
गणेश चतुर्थीला जेव्हा बाप्पाची मूर्ती घरी आणतो तेव्हा मूर्तीचा चेहरा हा कपड्याने का झाकलेला जातो, यामागील कारण तुम्हाला माहितीये का? परंपरा म्हणून नको शास्त्र समजून घ्या.
Ganesh Chaturthi 2024 : गणेशाच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. गणेश मूर्ती कार्यशाळेतून मोठ्या गणेशाचा मूर्ती मंडळात नेण्यात येत आहेत. गणेश चतुर्थीला बाप्पाच घरोघरी प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. वर्षानुवर्ष बाप्पाला घरी आणताना गणेशाचा चेहरा हा कपड्याने झाकलेला असतो. गणेशोत्सबाबत अनेक परंपरा आहेत. ज्या घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात आणि आपण त्या वर्षानूवर्ष पाळत आलो आहेत. पण त्यामागील कारण तुम्हाला माहिती असतात का? आज आपण चेहरा का झाकला जातो हे जाणून घेणार आहोत. प्रत्येक रिती मागील कारणं समजल्यास त्या मनोभावे करा. Ganesh Chaturthi 2024 why Should lord ganesha face be covered What does scripture say
चेहरा झाकणं गरजेचं आहे का?
ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर यांनी या प्रथेबद्दल सांगितलंय. ते म्हणतात जेव्हा तुम्ही बाप्पाला घरी आणण्यासाठी कार्यशाळेत किंवा दुकानात जातात. तुमची मूर्ती घेतल्यावर ती जागा मोकळी न ठेवता तिथे सुपारी आणि पैसे ठेवावेत. मूर्ती घरात आणताना मूर्तीचे तोंड आपल्याकडे करावे आणि विसर्जन करताना ते रस्त्याकडे चेहरा करावा. वैज्ञानिक दृष्ट्या मागे कारण जेव्हा आपण घरी गणपती आणतो आणि तो ठरलेल्या जागी प्राणप्रतिष्ठापना करतो तेव्हा ती जर गणेशाची मूर्तीचा चेहरा तुमच्याकडे असेल तर ते ठेवणं शक्य होतं.
अगदी तसंच विसर्जनाच्या दिवशी गणेशाची मूर्तीचा चेहरा रस्त्याच्या बाजूने असेल तर ती विसर्जन करणे सोपं जाते. आता मूर्तीचा चेहरा का झाकावा यामागील शास्त्रीय कारण की, कोणाच्याही दृष्टीस ती बाप्पाचा चेहरा पडू नये असा त्यामागील भाव असतो. घराच्या दारात औक्षण करुन कपडे काढले जातात. प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी मूर्ती खराब होऊ नये त्यामुळे ती झाकली जाते. यामागे खरं तर शास्त्र नाही ती एक प्रकारची काळजी आहे.
मूर्ती घरी आणताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!
गणरायाची मूर्ती दुकानातून आणतांना डोक्यावर टोपी घालावी. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. डोक्यावर काहीही न घालता पाहुण्याचं स्वागत करणे हा प्रकार आपल्या संस्कृतीत नाही. डोक्यावर काहीतरी घालून पाहुण्याचे स्वागत करणे हा त्या पाहुण्याचा सन्मान करण्याचा एक भाग हिंदू संस्कृती मानला जातो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)