मुंबई : भविष्य, किंवा तत्सम गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या पाहता अनेकजण हल्ली या विषयांमध्ये रस दाखवताना दिसत आहेत. काहीजण तर यामध्ये विश्वास दाखवत नसले तरीही त्यात असणारे संदर्भात  वाचण्यास कायमच प्राधान्य देताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानवी शरीर आणि त्यामधील काही घटकांचा थेट संपर्क हा आपल्या नशीबाशी असतो असं काही शास्त्र आणि पुराणांत म्हटलेलं आहे. 


शरीरावरीत तिळापासून ते अगदी नखं आणि दातांपर्यंत सर्वकाही अमुक एका व्यक्तीच्या भूतकाळापासून भविष्यापर्यंतचा आढावाही घेतं. 


मोत्याप्रमाणे सुंदर असणारे दातही शरीराचात एक भाग. कोणाचं सौंदर्य हे दात खुलवतात. तर, कोणाच्या चेहऱ्याला आकार देतात. तुम्हाला माहितीये का, समुद्र शास्त्रामध्ये या दाचांवरूनच व्यक्तीच्या नशिबाबद्दलही मोठे खुलासे झाले आहेत. 


अनेकदा व्यक्तींच्या समोरील दोन दातांमध्ये एक फट असते. जी मंडळी ही फट किंवा दातांमधील अंतर मिटवण्यासाठीचेही प्रयत्न करतात. 


पण, समुद्र शास्त्रानुसार ही मंडळी अतिशय नशीबवान असातात. शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत दमदार कामगिरी करतात. 


दातांमध्ये असणारी फट ही व्यक्तीच्या नशीबाकडे लक्ष वेधते. त्यांना आर्थिक चणचण सहसा उदभवत नाही. 


दात काहीसे पुढे असणारे लोकही चांगलं नशीब काढून आल्याचं म्हटलं जातं. ही मंडळी फार बडबडी आणि मनमिळाऊ असतात.