तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील या 4 सवयी, गरुड पुराणात सांगितलंय कारण
Garuda Purana Auspicious Things: हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ म्हणजे गरुड पुराण. गरुण पुराणात अनेक शिकवणी सांगण्यात आल्या आहेत. ज्याचा मनुष्याशी थेट संबंध आहे.
Garuda Purana Auspicious Things: हिंदू धर्मात सर्वात पवित्र धर्म पुरणांमध्ये गरुड पुराण याचे नाव आवर्जुन घेतले जाते. भगवान विष्णु यांनी गरुड पुराणात मनुष्याने त्याच्या आचरणात आणाव्यात अशा शिकवणी दिल्या आहेत. असं म्हणतात की गरुड पुराणात नमूद केलेल्या गोष्टी या भगवान विष्णु यांनी स्वतः सांगितल्या आहेत. गरुड पुराण हे भगवान विष्णुंनी त्यांचे वाहन असलेल्या गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या माहितीचे संकलन आहे. विष्णु पुराणाचेच गरुड पुराण हेदेखील एक हिस्सा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 13 दिवसांच्या आत हे गरुड पुराण वाचले जाते. यात सांगितलं गेलं आहे की अशा काही गोष्टी असतात त्यामुळं व्यक्तीला आयुष्यभर दुखः व वेदना सहन कराव्या लागतात.
गरुड पुराणानुसार एकाद्या व्यक्तीच्या सवयींमुळं तो उद्ध्वस्त होऊ शकतो. कोणत्या आहेत या सवयी ज्या व्यक्तीला कंगाल बनवू शकतात. जाणून घेऊयात.
खराब कपडे परिधान करणे
वेळेत स्नान न करणे व खराब कपडे परिधान करणारे व्यक्ती स्वतःहूनच आर्थिक संकट ओढावून घेतात. या सवयीमुळं त्यांचे आयुष्य गरीबीत जाते. अशा लोकांवर देवी लक्ष्मीदेखील नाराज असते. कारण देवी लक्ष्मी गलिच्छापासून लांब असते. देवी लक्ष्मी त्याच घरात वास करणे जिथे वेळोवेळी स्वच्छता राखली जाईल आणि लोकही अस्वच्छ राहणार नाहीत. नेहमी स्वच्छ व टापटीप राहणाऱ्या व्यक्तीवर देवी कधीच नाराज राहत नाही. नेहमी अस्वच्छ राहणाऱ्या लोकांचा खिसा नेहमीच रिकामा राहतो. त्यामुळं गरुड पुराणातही म्हटलं गेलं आहे की व्यक्तीने दररोज स्नान करावे त्याचबरोबर देवाचा जप करुन स्वच्छ कपडे परिधान करावेत.
नेहमी दुसऱ्यांना कमी लेखणे
जे लोक नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढतात किंवा कमी लेखतात, दुसऱ्यांच्या पाठीमागे बोलतात. त्याव्यक्तीबद्दल वाईट बोलतात अशा व्यक्ती नेहमीच देवी लक्ष्मीचा रोष ओढवून घेतात. गरुड पुराणातही याला पाप म्हटलं गेलं आहे. याचे फळ त्या व्यक्तीला जीवंत असतानाही व मृत्यूनंतरही भोगावे लागते. दुसऱ्यांना काहीही कारण नसताना ओरडणे व त्यांना उलट बोलणे असं केल्याने देवी लश्र्मी नाराज होते.
सूर्योदयानंतर झोपणे
सूर्योदयानंतर ही दुपारी झोपणाऱ्या व्यक्तींवर देवी लक्ष्मी नाराज होते. अशा व्यक्तींना आळशी प्रवृत्तीचे मानले जाते. त्यामुळं देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. त्यांच्याकडे संपत्ती व धनाची कमतरता भासते. अनेक प्रयत्न करुनही आर्थिक तंगी दूर करु शकत नाही. गरुड पुराणानुसार, सकाळी व संध्याकाळचा वेळ देवाच्या आरतीचा असतो अशावेळी देवाची आरती केल्यास लाभ मिळते मात्र जो व्यक्ती या वेळी आराम करतो त्याच्यावर भगवान नाराज होतात आणि आयुष्यभर दारिद्र्य येते.
दुसऱ्याच्या मालमत्तेवर नजर ठेवणे
काही लोक दुसऱ्यांच्या मालमत्तेवर व संपत्तीवर नजर ठेवतात. ती हडपण्याचा प्रयत्न करतात. अशी लोक दुखः व द्रारिद्रचा सामना करतात. अशा लोकांना वृद्धापकाळात अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. यापासून वाचण्यासाठी दुसऱ्यांच्या मालमत्तेवर कधीही डोळा ठेवू नये. गरुड पुराणानुसार असं केल्यास त्या व्यक्तीला नरकात स्थान मिळते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )