Name Astrology :  ज्योतिष शास्त्र आणि अंक शास्त्र हे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व जाणून घेण्यासाठी मदत करतात. आपलं नाव ही आपली ओळख असते. एखादं शास्त्र आपल्या नावाच्या अक्षरावरून आपलं आयुष्य कसं असेल हे सांगतात. म्हणून जन्म नावाला ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्वं आहे. त्यामुळे पालक मुलांचे नाव ठेवताना खूप विचारपूर्व ठेवतात. आज आम्ही तुम्हाला काही खास अक्षरांबद्दल सांगणार आहोत. जर कुठल्या मुलीचं नावाचं पहिलं अक्षर हे असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. 


कुठेली आहेत 'ही' अक्षरं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

K - ज्या मुलांचं नाव K ने सुरु होते त्या मुली खूप महत्त्वकांक्षी असतात. या अक्षराच्या मुली कायम आपली वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्नात असतात. त्यांच्या बुद्धीने त्या पैसा आणि यश दोन्ही प्राप्त करतात. ते जे काही काम हातात घेतात ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात. तसंच त्यांची कामाबद्दलची बांधिलकी पाहून त्यांचा कार्यक्षेत्रात सन्मान होतो. 


M - ज्या मुलांच्या नावाची सुरुवात M या अक्षरांने होते या मुली पैशांच्या बाबतीत भाग्यवान असतात. त्यांची मेहनत त्यांना शिखरापर्यंत पोहोचवते. तर त्यांची वक्तृत्व हे सर्वांनाच भुरळ घालते. कार्यक्षेत्रात त्यांची एक वेगळी ओळख असते. त्यांचा व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलो तर त्या खूप आकर्षित असतात. 


P - ज्या मुलींचं नाव P या अक्षराने होते त्या मुली पुढे जाण्यासाठी जिद्दी असतात. या मुलींना समाजात एक वेगळी ओळख निर्माण करायची असते. त्यासाठी त्या कायम खूप मेहनत घेत असतात. या मुली जिथे पण जातात तिथे त्या आकर्षणाचे केंद्र बनतात. तर या मुली बोलण्यात खूप तेज असतात आणि त्यांना त्यांचं काम काढणं बरोबर जमतं.