मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार अशी काही अक्षरं आहेत. ज्या अक्षरांपासून नावाची सुरुवात होणाऱ्या मुली खूप भाग्यवान असतात असं मानलं जातं. विशेषतः त्या मुली वडिलांसाठी खूप भाग्यवान असल्याचे सिद्ध होतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या जन्मानंतर वडिलांची आर्थिक स्थिती सुधारू लागते, असं म्हणतात. ज्या घरात त्यांचा जन्म होतो त्या घरात पैसा आणि अन्नाचीकमतरता नसते. त्यांच्या चांगल्या नशीबाचा फायदा त्‍याच्‍या वडिलांनाही होतो.

A अक्षर-
ज्या मुलींचे नाव A  या अक्षराने सुरू होते, त्या आपल्या वडिलांसाठी भाग्यवान ठरतात. त्या धाडसी, निडर, आत्मविश्वासू आणि मेहनती असतात. त्यांना आयुष्यात जे काहीमिळवायचे असते ते त्या कष्टाने मिळवतात. त्यांचे नशीब खूप चांगलं असतं. त्यामुळे त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

D अक्षर -
ज्या मुलींचे नाव D या अक्षराने सुरू होते त्या भाग्याने धनी असतात असं मानलं जातं. तिच्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे भाग्य बदलते. त्यांना आयुष्यात पैशांची कधीही कोणतीही
अडचण येत नाही. त्या मनाने खूप साफ असतात आणि कठोर परिश्रम करून जीवनात काहीही साध्य करू शकतात. या मुली वडिलांचे नशीब चमकवतात.

L अक्षर -
ज्या मुलींचे नाव  L या अक्षराने सुरु होतं, त्या प्रमाणिक असतात. त्यात स्वत:ला योग्य वाटेल ते करतात. ती आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन चालणारी मुलगी असते. सर्वांना आनंदी ठेवण्याचा ती सर्वतोपरी प्रयत्न करते. या मुली इमोशनल असतात, पण आयुष्यात समोर कोणतंही संकट आलं, तरी हार मानत नाही. वडिलांची ताकत बनतात..

P अक्षर-
ज्या मुलींचे नाव  P या अक्षराने सुरु होते, त्या भाग्याने धनी असतात. या मुली वडिलांचे नशीब चमकवतात. त्या आपल्या घरच्यांच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतात.
आपल्या आई-वडिलांचं नाव त्या मोठं करतात. आयुष्यात आपली एक वेगळी ओळख त्या बनवतात.