Success Tips: चांगल्या कामासाठी घरातून बाहेर पडताना `या` दोन गोष्टी नक्की करा, व्हाल धनवान
Good Luck Tips: जेव्हा कोणत्याही शुभ कार्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडता त्यावेळी नेमकं काय करावे, जेणेकरून तुमचा दिवस चांगला जाईल?
Good Luck Tips, success Tips: कोणत्याही शुभ कार्यासाठी घरातून बाहेर पडताना दही-साखरेने तोंड गोड करणे ही वर्षानुवर्षे चालत आलेली एक पद्धत आहे. तर काही नागरिक ज्योतिष शास्त्र विचारात घेऊन घराबाहेर पडत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि वाटेत तुम्हाला अश्याकाही गोष्टी दिसल्या तर त्या तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतात तसेच तुम्हाला धनवानही बनवू शकतात. शास्त्रामध्ये अश्या काही संकेतांचा उल्लेख केलेला आहे ज्यामुळे तुमचे नशीब चमकू शकते. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टींविषयी...
कोणताही दिवस किंवा काम लहान किंवा मोठे नसते. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षणाचे स्वतःचे महत्त्व आहे. अशा स्थितीत जेव्हाही घराबाहेर पडाल तेव्हा देवाचे नाव घेऊन उजवा पाय बाहेर काढा. दुसरीकडे, जर तुम्ही एखाद्या खास कामासाठी जात असाल तर दही खाऊन घरी जा, यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. विशेषत: शुक्रवारी घराबाहेर पडताना दही खाल्ल्याने कार्य सिद्ध होते.
वाचा : रविवारी 'या' वेळी शुभ कार्य करा; कोणताही अडथळा येणार नाही, पंचांगानुसार पाहा सर्व शुभ- अशुभ वेळा
त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही घराबाहेर पडताना कुटूंबातील उपस्थित सदस्यांना टाटा किंवा बाय-बाय बोलू निघतात. मात्र ज्योतिष शास्त्रांनुसार बोलायचं झाल तर 'सिद्दी गणेश-दही मासा' असेम म्हणत घराच्या बाहेर पडा. त्यामुळे तुमची कामे यशस्वीरित्या पार पडतील.
काय करू नये-
1. घराबाहेर पडताना, शुभ कार्यासाठी जाताना डावा पाय बाहेर काढू नका. हे अशुभ मानले जाते.
2. कामासाठी घराबाहेर पडताना राहुकालची काळजी घ्या. राहुकाळात शुभ कार्यासाठी बाहेर पडू नका. घरातून निघताना त्या दिवशी शुभ गोष्टींचे सेवन करा. यामुळे काम यशस्वी होईल, अडथळे दूर होतील. ग्रहांची नकारात्मकता किंवा अशुभ प्रभावही संपुष्टात येईल. रविवार ते शनिवार या सातही दिवस राहुकाळाचा काळ वेगवेगळा असतो. एखाद्या पात्र ज्योतिषाला विचारून तुम्ही डायरीत याची नोंद करू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)