Good Morning Tips :  प्रत्येकाला वाटतं आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी. आपण हाती घेतलेलं काम नीट व्हावं, यात आपल्याला यश मिळावं. हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यापूर्वी काय केलं पाहिजे याबद्दल उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय पाळल्यास तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळतं. तुमची आर्थिक प्रगती होते. पण तुमचं एक चुकीचं पाऊल तुमचं मोठं नुकसान करु शकते. म्हणून म्हणतात सकाळी घरातून बाहेर पडताना तुम्ही कुठला पाय आधी टाकता यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. (good morning tips Which foot should be put forward first while leaving the house right or left and rich in life Money in marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय, घराबाहेर जात असाल तर तोंड गोड करून जा, किंवा दही खाऊन जा, असं अनेकदा सांगितलं जातं. तुमची परीक्षा असेल किंवा तुम्ही इतर काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर दही-साखर खाऊन जा, म्हणजे तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होऊ शकता. या सर्व छोट्या-छोट्या समजुतींचा आपल्या जीवनावर परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते तसंच आपलं मन सकारात्मक राहतं.


असं मानलं जातं की जर तुम्ही सकाळी लवकर घराबाहेर जात असाल तर सर्वात आधी तुमचा उजवा पाय घराबाहेर ठेवा. सर्वप्रथम उजवा पाय घराबाहेर ठेवणे खूप शुभ मानलं जातं. असे केले तर तुमचा दिवस चांगला जातो, असं म्हणतात. जेव्हा तुम्ही गृहप्रवेश करता, तुम्ही तुमच्या घरात पाऊल ठेवता तेव्हाही तुम्हाला तुमच्या उजव्या पायाने प्रवेश करण्यास सांगितला जातो. दुसरीकडे, लग्नानंतर नवीन नवरी पहिल्यांदा घरी येते तेव्हा ती उजव्या पायाचा कलश टाकते आणि उजवा पाय आधी घरात ठेवते. पण जर तुम्ही डावा पाय घराबाहेर ठेवला किंवा गृहप्रवेश करताना डावा पाय पहिले टाकला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)