Govardhan Puja 2023 : काय आहे गोवर्धन पूजा आणि अन्नकूटचं महत्त्व? पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या
Govardhan Puja 2023 : गोवर्धन पूजा नेमकी काय आहे आणि ती का केली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या गोवर्धन पूजा शुभ मुहू्र्त, महत्त्व...
Govardhan Puja 2023 : गोवर्द्धनधराधार गोकुलत्राणकारक । विष्णुबाहुकृतोच्छ्राय गवां कोटिप्रदो भव ॥ या लक्ष्मीर्लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता । घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु ॥ अग्रतः सन्तु मे गावो गावो मे सन्तु पृष्ठतः । गावो मे हृदये सन्तु गवां मध्ये वसाम्यहम् ॥
दिवाळी सणामधील अजून एक महत्त्वाचा सण म्हणजे गोवर्धन पूजा. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला गोवर्धन पूजा केली जाते. याच पूजेला अन्नकूट असंही म्हटलं जातं. यादिवशी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. गोवर्धन पूजा ही भगवान श्रीकृष्णाला समर्पित करण्यात आला आहे. यादिवशी अंगणात गोवर्धन पर्वत, श्रीकृष्ण आणि गायींची पूजा केली जाते. (govardhan puja 2023 significance importance puja rituals and annakoot festival 2023)
गोवर्धन पूजा तिथी ( Govardhan Puja 2023)
2023 मध्ये कार्तिक महिन्यातील प्रतिपदा शुक्ल पक्ष मंगळवार 14 नोव्हेंबरला दुपारी 4:18 वाजेपासून बुधवार 15 नोव्हेंबरला दुपारी 2:42 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 14 नोव्हेंबरला गोवर्धन पूजा करण्यात येणार आहे.
गोवर्धन पूजेची पद्धत
गोवर्धन पूजेच्या दिवशी अंगणात शेणाने गोवर्धन पर्वत साकारावा. त्यासोबत मातीची गाय किंवा वासरुही तयार करावे. पूजा विधीमध्ये आधी श्रीकृष्णाला दुधानं आंघोळ घालावी. यानंतर श्रीकृष्णाची पूजा करुन अन्नकूट अर्पण करावा.
गोवर्धन पूजेमागील आख्यायिका
पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने आपल्या बोटावर गोवर्धन पर्वत उचलून ब्रज लोकांचं आणि पशू-पक्ष्यांचं भगवान इंद्राच्या कोपापासून रक्षण केलं होतं. यामुळेच गोवर्धन पूजेमध्ये गिरीराजांसह भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. या दिवशी अन्नकूटाचे विशेष महत्त्व मानले जाते.
अन्नकूट म्हणजे काय ? (annakoot festival 2023)
विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट असं म्हटलं जातं. या दिवशी गायींना अन्न देऊन आणि त्यांची उपासना करून शहराबाहेर गाजे आणि बाजे सोबत जातात. तेथे प्रत्येक गाईची आरती करण्यात येत. असं केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो, अशी मान्यता आहे.
तर राजस्थानमध्ये उत्सवात देवाचा प्रसाद लुटण्याची अनोखी परंपरा पाळली जाते. आदिवासी बांधव मंदिरातून प्रसाद लुटतात ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)