Gudi Padwa 2023 Puja: हिंदू कॅलेंडरनुसार, हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला होते. वर्षाचा पहिला सण म्हणून गुढी पाडवा साजरा केला जातो. हिंदू धर्मात गुढी पाढवा या सणाला फार महत्व आहे. आध्यात्मिकदृष्ट्या देखील   या सणाचे खूपच महत्व आहे.  गुढी पाढव्याच्या दिवशी काही पूजा विधी केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. यामुळे या दिवशी देवतांची पूजा करून काही उपाय केल्याने भक्तांना वर्षभर सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते (Gudi Padwa 2023 Puja).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू पंचांगानुसार 22 मार्च 2023 यंदाचा गुढी पाढवा सण साजरा केला जाणार आहे. गुढी पाडव्या दिवशी काही धार्मिक उपाय केल्यास निश्चित फायदा होईल. ज्याचा तुम्हाला वर्षभर लाभ मिळेल. गुढी पाडव्या दिवशी  ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असा समज आहे. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आले. यावेळी त्यांचे स्वागत गुढ्या उभारुन करण्यात आले. यामुळेच आनंद सोहळा म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. गुढी पाढवा हा शुभ मुहूर्त मानला जातो. यामुळेच अनेक जण सोनं खरेदी देखील करतात.  गुढी पाडव्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा बाल्कनीत गुढी उभारल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते, भाग्यरेषा चमकते.


गुढी पाढव्याच्या दिवशी ही काम न विसरता करा


  • गुढीपाडव्याच्या ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे करा. यानंतर सुगंध, फुले, धूप, दिवा इत्यादींनी देवाची पूजा करा.

  • पाटावर पांढर्‍या रंगाचे कापड पसरून त्यावर हळद किंवा कुंकू लावून अष्टकोनी कमळ बनवावे. यानंतर कमळाच्या मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करा.

  • गणपतीची आराधना करावी. ‘ओम ब्रह्मणे नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विधीपूर्वक ब्रह्मदेवाची पूजा करावी.

  • गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवून त्यात मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी आणि साखर घालून सेवन करावे. यामुळे आरोग्य वर्षभर चांगले राहते. शारीरिक वेदनाही दूर होतात.

  • चैत्र नवरात्रीची सुरुवातही चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला होते. अनेकजण या दिवशी घटस्थापना करुन उपवास देखील करतात. चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने समृद्धी, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.