Gudi Padwa 2023 Date and Puja Vidhi Marathi : येत्या काही दिवसांवरच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र पाडव्याचा (Chitra Padwa) सण येतो आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरूवात होते. गुढीपाडवा या सणाची आपण सर्वचं जणं आतुरतेनं वाट पाहत असतो. यावेळी खमंग पुरणपोळ्या, श्रीखंड पुरी, साग्रसंगीत जेवणाची (Gudi Padwa Tradition)  जय्यत तयारी असते. गुढीपाडव्याच्या मिरवणूकीतही आपण सर्वचजण हे आवर्जून सहभागी होतो. नववारी साड्या, हिरवा चुडा, नथ, दागदागिने अन् फेटा असा पारंपारिक लुक करून तरूण मुली या मिरवणूकीत सहभागी होतात. त्यामुळे हा सण म्हणजे सगळ्यांसाठी नवचैतन्याचा (Gudi Padwa Miravnuk) आणि आनंदाचा असतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की या दिवसाचे महत्त्व नक्की आहे तरी काय? या दिवशी आपण गुढी उभारतो आणि त्याची मनोभावे पुजा करतो तेव्हा जाणून घेऊया गुढी कधी उभारावी आणि कधी काढावी? (gudi padwa 2023 date and puja vidhi muhurat know what is the scientic reasons and significance of gudi padwa vidhi and traditions in marathii)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम अयोध्येत परत येतात म्हणून आपण गुढीपाडवा (Why we celebrate Gudi Padwa) हा सण साजरा करतो. गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्र ही सुरू होते आणि रामनवमीला (Ramnavmi) ही नवरात्र संपते. यादिवशी पंचांगाची (Panchang) पूजा करून त्याचे वाचन करावे. त्यानंतर गुढीपाडव्याची पूजा करतो आणि मग कुटुंबियांसमवेत भोजन करतो. घराबाहेर रांगोळी काढतो. कडुलिंबाची पानं खातो अन् सुर्यास्तापुर्वी गुढीवर हळद-कुंकू व अक्षता वाहतो. हा गुढीपाडव्याचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैंकी एक आहे. आपण या दिवशी आपल्या आत्पजनांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. 


काय आहेत शास्त्रीय कारणं? 


या दिवशी आपली आई, आत्या नाहीतर आज्जी आपल्याला कडूलिंबाची पानं खायला देतात. अनेकांना कळत नाही की कडूलिंबाची पानं खाण्याचे या दिवशीचे महत्त्व काय आहे. यावेळी आपण आपल्या सोयीनुसार कडुलिंबाच्या पानात मिरी, मीठ, ओवा, डाळ घालूनही ते मिश्रण कुटुंबियांना खायला देतो. यानं नव्या वर्षाची सुरूवात चांगली होते. हे मिश्रण खाल्ल्यानं कुटुंबियांचे आरोग्य हे निरोगी राहते. यावेळी कडुलिंबाची पानं खाऊन गुढीला अन् प्रभु रामदेवांच्या प्रतिमेला वंदन करावे. 


कधी करावी पूजा अन् कधी गुढी उतरावी? 


सकाळी मुहूर्ताच्या वेळी गुढी उभी करावी आणि सुर्यास्ता होण्याआधी तिचे पूजन करावे, त्यानंतर गुढी उतरवावी. यावेळी दारावर आंब्याच्या आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावं. गुढी उभारताना वेळूची काठी आणून ती धुवावी आणि स्वच्छ वस्त्र आणि सुगंधित फुलांची माळ त्यावर तांब्या अथवा फुलपात्र ठेवावे. बत्ताश्याची माळ घालावी अन् कुटुंबियांसमवेत गुढी उभारावी.