Gudhi Padwa Significance In Marathi : उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी...हिंदूचं नवं वर्ष म्हणजे मराठी लोकांचही नवीन वर्ष सुरु होतं. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाची सुरुवात ही घरोघरी गुढी उभारुन करण्यात येते. पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात असतो. याला महापर्व असंही म्हटलं जातं. मराठी घरांमध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुढी उभारली जाते. या गुढीला विजयाच प्रतिकही म्हटलं जातं. अंगणात रांगोळी, दारात तोरण आणि घराच्या दारात, कुठे बाल्कनीत तर कुठे गच्ची यशाची, विजयाची आणि आपुलकीची गुढी उभारली जाते. (Gudi Padwa 2024  Do you know why Gudi is erected on Gudi Padwa importance Significance in marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढी उभारणं म्हणजे त्यासाठी उंच अशी बांबूची काठी, त्यावर रेश्मी साडी चाळी, कडुलिंब आणि अंब्याची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठी मग त्यावर चांदी किंवा पितळ्याचा कलश अशी कुठली मांगल्याच प्रतिक असते. पण तुम्ही कधी विचार केला का की तुमच्या घराती कोणी हा प्रश्न विचारला का? गुढीपाडव्याला ही अशी गुढी का उभारली जाते ते?


गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? 


यंदा गुढीपाडव्याचा सण हा मंगळवारी 9 एप्रिल 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. गुढी उभारण्याची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतीपदेपासून श्री शालिवाहन राजाने शके गणनेला केली होती. धार्मिक शास्त्रात असा उल्लेख आहे की, शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडून प्राण फिकले. या सैन्यांच्या जोरावर त्याने शत्रूंचा पराभव केला. या विजयाचं प्रतिक म्हणजे शालिवाहन शके असं नवीन वर्षाची सुरुवात असते. आपल्यामधील आणि आपल्या आजूबाजूमधील वाईट वृत्तीवर विजय मिळवण्यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते. 


हेसुद्धा वाचा - Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत 'या' गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा


गुढी आणि रामायणाचासंदर्भ 


रामायाणानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रभू रामाने वालीचा वघ करुन प्रजेला त्याच्या जाचापासून मुक्त केलं होतं. रामाच्या विजयाच प्रतिक म्हणजे ही विजयाची गुढी उभारण्यात येते. त्यासोबत या तिथीला प्रभू रामाचा 14 वर्षांच्या वनवास संपला होता. म्हणून गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत भारतात आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. 


तर दुसरीकडे यादिवशी धार्मिक ग्रंथानुसार ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. भगवान विष्णूने मत्स्यरुप धारण करुन शंकासुराचा वध केला होता. त्यामुळे ही तिथी म्हणजे भगवान विष्णूंचा मत्स्यरुपा जन्म दिवस मानला जातो. 


हेसुद्धा वाचा - Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचा सण इतका खास का? जाणून घ्या रंजक तथ्यासह तिथी आणि शुभ मुहूर्त


पाडवा शब्द कुठून आला?


त्याशिवाय पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठीत अपभ्रंश करुन त्याचा पाडवा असा शब्द झाला. या शब्दाचा मराठी अर्थ हा चंद्राची कला असा होतो. चैत्रशुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढतो म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला 'चैत्रपाडवा' असं म्हटलं जातं. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)