Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत 'या' गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा

Chaitra Navratri 2024 : वर्षात चार नवरात्री येतात, त्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याला सुरुवात अशात चैत्र नवरात्री कधी आहे. कुठल्या देवींची पूजा करतात आणि नवरात्रीमध्ये काय करावं जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Apr 6, 2024, 01:40 PM IST
Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत 'या' गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे नेतील, अशी करा देवींची पूजा title=
Chaitra Navratri to Ram Navami worship these things that will take you from negativity to positivity ghatasthapana shubh muhurat puja vidhi

Chaitra Navratri 2024 : हिंदू नवं वर्ष म्हणजे महाराष्ट्रीय लोकांचा गुढीपाडवा हा चैत्र महिन्याची सुरुवात असते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील सण आणि व्रताला अतिशय महत्त्व आहे. वर्षात 4 नवरात्री येत असतात, त्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यंदा चैत्र महिना म्हणजे गुढीपाडवा हा 9 एप्रिल मंगळवारी आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ होणार आहे. (Chaitra Navratri to Ram Navami worship these things that will take you from negativity to positivity ghatasthapana shubh muhurat puja vidhi)

चैत्र नवरात्री घट स्थापना शुभ मुहूर्त!

पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी ही 8 एप्रिलला रात्री 11.50 पासून दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल रात्री 8.30 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार चैत्र नवरात्री ही 9 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. 

यंदा चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंचकची सावली असणार आहे. 9 एप्रिल मंगळवारी पंचक सकाळी 7.32 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर चैत्र नवरात्रीसाठी घटस्थापना करण्यात येणार आहे. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 9.12 ते 10.47 वाजेपर्यंत असणार आहे. तर घटस्थापनेसाठी अतिशय शुभ असा अभिजीत मुहूर्त हा सकाळी 11:57 ते दुपारी 12:48 पर्यंत असणार आहे. यंदा चैत्र नवरात्रीला अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे. यादिवशी सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. 

चैत्र नवरात्री शक्ती साधना (Navratri Shakti Sadhana)

चैत्र नवरात्रीमध्ये काही ठिकाणी ललिता देवीची पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी दुर्गादेवीच्या 9 रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे 9 दिवसाचे तीन विभाग करण्यात आले आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ परवीन शर्मा यांनी सांगितलंय. पहिल्या तीन दिवसांमध्ये कालामातीची पूजा करण्यात येते. कालीमाती आपल्या नकारात्मक गुणांचा नाश करते. पुढच्या तीन दिवसांमध्ये माता लक्ष्मीची पूजा करण्यात येते. माता लक्ष्मी आपल्यामधील राजसिक गुणांचा समतोल राखते. मग शेवटच्या तीन दिवसांमध्ये मा सरस्वतीची पूजा करतो. याचा अर्थ नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत आपण या 9 दिवसांमध्ये आपण तमातून सत्त्वाकडे जातो. म्हणजेच आपण नकारात्मकतेकडून सकारात्मतेकडे जातो. 

हेसुद्धा वाचा - Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचा सण इतका खास का? जाणून घ्या रंजक तथ्यासह तिथी आणि शुभ मुहूर्त

चैत्र नवरात्रीमध्ये काय साधना करायची?

परवीन शर्मा सांगता की, या 9 दिवसांमध्ये सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर दिवा लावून माताची पूजा करा. दुर्गा गायत्री मंत्र किंवा नवदुर्गास समर्पित 9 मंत्रांचा जप करा. त्यासोबत श्रीदुर्गासप्तशतीचं पठण करा. यात 13 अध्याय असून ते 9 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. 

प्रत्येक साधकाने नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योती लावली पाहिजे. कारण ती तुमची जाणीव आणि तुमच्या साधनेतील समर्पणाशी मिळतेजुळते असते. शेवटी हा प्रकाश तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करतो.
नवरात्रीमध्ये उपवासाला महत्त्व असून साधक 9 दिवस काही खात नाही. जर तुम्हाला शक्य नसेल तर दिवसा फक्त एक वेळ जेवा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)