Guru Budh Gochar 2023: रेवती नक्षत्रामध्ये गुरु-बुधाची युती; `या` राशींवर होणार पैशांचा पाऊस
गुरु आणि बुधाचं हे संक्रमण 5 राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे. यासोबतच काही राशींची प्रगतीही होणार आहे. जाणून घेऊया गुरू आणि बुध यांच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकणार आहे.
Revati Nakshatra: गुरु (Guru) आणि बुध (Budh) हे दोन्ही ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानले जातात. दरम्यान आता या दोन ग्रहांची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह हा ज्ञानाचा कारक असून बुध हा तर्कशास्त्रचा कारक मानला जातो. हे दोन्ही ग्रह मिळून रेवती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत.
गुरु आणि बुधाचं हे संक्रमण 5 राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे. यासोबतच काही राशींची प्रगतीही होणार आहे. जाणून घेऊया गुरू आणि बुध यांच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकणार आहे.
मेष राशी
बुध आणि गुरूच्या यांच्या संयोगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्णपणे साथ मिळू शकणार आहे. या काळामध्ये तुम्हाला वडिलोपार्जित असलेल्या मालमत्तेतून लाभ मिळणार आहे. या महिन्यांच्या अखेरी तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पैसे कमावण्याच्या चांगल्या संधीही मिळू शकणार आहेत.
मिथुन राशी
या राशीच्या व्यक्तींसाठी गुरू आणि बुध या दोन्ही ग्रहांता संयोग फार फायदेशीर ठरणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला अनेक नव्या संधी मिळणार आहेत. गाडी, जमीन तसंच इतर मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं आणि मेहनतीचे कौतुक होणार आहे.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ असणार आहे. तसंत सर्जनशील कामामध्ये गुंतलेल्या लोकांसाठी वेळ फलदायी ठरेल. या काळामध्ये तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची भरभराट होणार आहे.
धनू राशी
या राशीच्या व्यक्ती नवीन जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी वेळ चांगली आहे. करिअरच्या दृष्टीने नोकरी बदलण्याची संधी मिळू शकणार आहे. तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फलदाजी ठरणार आहे.
कुंभ राशी
बुध आणि गुरूच्या संयोगाने शिक्षक वर्गाला खूप फायदा होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फार शुभ ठरू शकतो. खासकरून व्यवसायिकांना या काळामध्ये जास्त फायदा होणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)