Guru Gochar 2023: गुरू करणार मेष राशीत प्रवेश; `या` राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार!
Devguru Brihaspati Gochar 2023: बृहस्पतींना देवांचा गुरु मानलं जातं. यावेली गुरूचं परिवर्तन मेष राशीमध्ये होणार आहे. गुरुच्या या राशीपरिवर्तनामुळे गजलक्ष्मी योग तयार होणार आहे. गुरु ग्रहाच्या या गोचरमुळे काही राशींवर खूप चांगला प्रभाव पडणार आहे.
Guru Gochar 2023: देवगुरु बृहस्पतिच्या स्थितीत 2023 मध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये नेहमी ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही राशींच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडणार आहे आणि काय घडण्याची शक्यता असते हे ग्रह ठरवतात. येत्या 22 एप्रिल रोजी असाच एक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बृहस्पतींना देवांचा गुरु मानलं जातं. यावेली गुरूचं परिवर्तन मेष राशीमध्ये होणार आहे. गुरुच्या या राशीपरिवर्तनामुळे गजलक्ष्मी योग तयार होणार आहे. गुरु ग्रहाच्या या गोचरमुळे काही राशींवर खूप चांगला प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मिथुन रास
या राशीच्या अकराव्या स्थानात गुरु गोचर होणार आहे. गुरुच्या राशी परिवर्तनामुळे या राशीच्या व्यक्तींना चांगला फायदा होण्याची चिन्ह आहे. यामध्ये या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळणार आहे. काहींचं प्रमोशन देखील होऊ शकतं. तसंच या काळामध्ये नशिबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणुक कराल तिथून चांगला लाभ मिळणार आहे.
मेष रास
गुरु गोचरचा या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्याच चांगला परिणाम दिसून येणार आहे. खासकरून हा काळ विद्यार्थ्यांसाठी अगदी चांगला आणि योग्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. अडकलेली कामं या काळामध्ये मार्गी लागू शकतात. त्याचप्रमामे कौटुंबिक जीवनातील जर काही मतभेद असतील तर ते संपणार आहेत.
कर्क रास
या राशीच्या व्यक्तींनाही गुरुच्या गोचरमुळे फायदा होणार आहे. या काळामध्ये तुमचं आरोग्य अगदी उत्तम राहणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होणार आहे.
मीन रास
गुरु गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिकदृष्टा चांगली असणार आहे. ज्या व्यक्तींचे कुठे पैसे अडकलेले असतील त्यांना त्यांचे हे पैसे मिळू शकणार आहेत. व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. त्याचप्रमाणे अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. नोकरी आणि उद्योगात प्रगती होण्याचीही शक्यता आहे.
(Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)