Guru Uday 2023 in Marathi :  ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्त्वं आहे. आपल्या कुंडलीतील ग्रह कुठल्या राशीत आहेत यावर आपल्या जीवनातील घडामोडी ठरल्या असतात. तुमची आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन, करिअर, अगदी मुलं सगळ्या गोष्टींबद्दल कुंडलीतून उत्तरं मिळतात. जेव्हा एखादा ग्रह हा एका स्थानतून दुसऱ्या स्थानी जातो यालाच ज्योतिषशास्त्रात गोचर असं म्हणतात. तर याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो. देवगुरु एप्रिलमध्ये मीन राशीत उदयास येईल. या दरम्यान मध्य त्रिकोणी राजयोग तयार (kendra trikona rajyog benefits) होत आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल. पण तीन राशींच्या लोकांसाठी हा राजयोग आहे. (Guru Gochar 2023 Jupiter Rise In Meen Guru Uday 2023 kendra trikone rajyog these zodiac sign people Aquarius Gemini Cancer financial prosperity lot fo money in marathi)


कर्क (Cancer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूच्या उदयामुळे कर्क राशीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. याचा अर्थ गुरु ग्रह तुमच्या राशीतून नवव्या घरात भ्रमण करणार आहे. ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे. रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. व्यवसाय आणि कामाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळेल.  


मिथुन (Gemini)


मध्य त्रिकोणी राजयोग या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या दहाव्या घरात गुरु ग्रहाचा (kendra trikona houses) उदय होणार आहे. यामुळे बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे.तर नोकरदार लोकांसाठी वेतनवाढ आणि पदोन्नतीची शक्यता आहे. इतकंच नाही तर या काळात नवीन बिझनेस डीलही होणार. शास्त्रानुसार या राशीच्या कुंडलीत हंस राजयोग तयार होत आहे, जो जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला बंपर लाभ देणार आहे. 


कुंभ (Aquarius)


गुरूच्या उदयामुळे या राशीच्या लोकांनाही शुभ परिणाम मिळतील. तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात गुरुचा उदय होणार आहे. अशा परिस्थितीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या काळात तुमची वाणी पूर्वीपेक्षा गोड राहणार आहे. तसंच 17 जानेवारीपासून या राशीचे लोक साडेसातीपासून मुक्त झाले आहेत. त्यामुळे तुमची रखडलेली कामं पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)