Guru Pournima 2022: गुरुपौर्णिमेला चार राजयोग! `हे` उपाय करून मिळवा अडचणीवर मात
सणांच्या दिवशी ग्रहांची स्थिती उत्तम असल्यास शुभ योग घडून येतात. आषाढ महिन्यातील गुरूपौर्णिमेलाही असाच योग तयार होत आहेत.
Guru Pournima 2022 Shubh Sanyog: हिंदू धर्मात प्रत्येक सणाला महत्त्व आहे. कधी कधी या सणांच्या दिवशी ग्रहांची स्थिती उत्तम असल्यास शुभ योग घडून येतात. आषाढ महिन्यातील गुरूपौर्णिमेलाही असाच योग तयार होत आहेत. गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा केली जाते. गुरू हाच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतो, म्हणून हिंदू धर्मात गुरूला विशेष दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय आषाढ पौर्णिमा हा गुरु वेद व्यास यांचा जन्मदिवस असून हा सण त्यांना समर्पित आहे. महर्षी वेद व्यास यांनी वेद आणि पुराणांची रचना केली आहे.
गुरुपौर्णिमा 13 जुलै 2022 रोजी बुधवारी साजरी केली जाणार आहे. या गुरुपौर्णिमेला चार अतिशय शुभ राजयोग तयार होत आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास खूप प्रभावी फळ मिळते. यंदा राजयोग तयार झाल्याने गुरुपौर्णिमेचे महत्त्व वाढले आहे. कोणत्या समस्येसाठी काय उपाय करावेत ते जाणून घ्या.
कार्यात यश मिळवण्यासाठी उपाय : गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण मंदिरात नारळ अर्पण करा. तसेच भगवान विष्णूची पूजा करावी. आपल्या क्षमतेनुसार दान करा. पिवळी मिठाई आणि कपडे दान करा. असे केल्याने कुंडलीत गुरु दोषही दूर होईल आणि नशीबाची साथ मिळू लागेल.
पैशाची कमतरता दूर करण्यासाठी उपाय : पैशाची कमतरता दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेला गरजू लोकांना चणाडाळ दान करा. पिवळी मिठाई दान केल्याने गुरू बलवान होतो आणि आर्थिक स्थिती चांगली राहते.
वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी उपाय : विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु यंत्राची स्थापना करा. गुरु यंत्राची दररोज विधिवत पूजा. असं केल्याने लग्नातील अडचणी दूर होतील.
विद्यार्थ्यांसाठी उपाय : ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत किंवा अपेक्षित यश मिळत नाही त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायीची सेवा करावी. गुरूंचा आदर करा आणि गीतेचं पठण करावं. शक्य असल्यास गीतेचा काही भाग रोज वाचावा. जलद लाभ होईल. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा करून आशीर्वाद घ्या. पिवळे वस्त्र दान करा. असे केल्याने भाग्याची साथ मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)