मुंबई : 27 जुलै 2018 म्हणजे उद्या यंदाची गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. गुरूपौर्णिमेला यंदा शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण असल्याने या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. गुरूपौर्णिमेला प्रत्येकजण त्याच्या आयुष्यातील गुरू स्थानी असलेल्या व्यक्तीचे पूजन करते. त्याच्या बद्दलचा आदर व्यक्त करतो.  


काय आहे गुरूपौर्णिमेचं महत्त्व  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरूपोर्णिमा ही आषाढी पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी आकाशात पूर्ण प्रकाशमान असलेला चंद्र गूरूसारखा असतो. तर शिष्य हे आषाढातील ढगांप्रमाणे असतात. ढगांच्या अंधारातही चंद्र त्यांना प्रकाश दाखवतो. गुरूदेखील असाच आहे. वातावरणात म्हणजेच शिष्याच्या आयुष्याला प्रकाशमान करण्याचं काम चंद्ररूपी गुरू करत असतो. म्हणूनच आषाढी पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. 


गुरू पौर्णिमेचा मुहूर्त  


26 जुलै 2018 च्या रात्री 11 वाजून 16 मिनिटांनी गुरू पौर्णिमा सुरू होते. ही पौर्णिमा 27 जुलै 2018 रोजी रात्री 1 वाजून 50 मिनिटांनी पूर्ण होते. 


गुरूपौर्णिमेदिवशी सकाळी उठून आंघोळ  करून स्वच्छ वस्त्र धारण करा. त्यानंतर तुमच्या आयुष्यात गुरूस्थानी असलेल्या व्यक्तीला वंदन करा. त्यांची भेट घेऊन तुमच्या मनातील आदर,प्रेम व्यक्त करा. 


'गुरुपरंपरासिद्धयर्थं व्यासपूजां करिष्ये' हा मंत्रजपदेखील करून देवाची पूजा केली जाते.