Guru Pushya Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि नक्षत्राला अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीवर जाचकाच्या आयुष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतात. सर्व 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ असं नक्षत्र मानले जाते. जसं 9 ग्रहांचा राजा सूर्यदेव आहे. तसाच नक्षत्रांचा राजा हा पुष्य आहे. आज अतिशय गुरु-पुष्य योगाचा अतिशय शुभ संयोग जुळून आला आहे. (Guru Pushya Yoga 2023 july 30 today these 4 zodiac signs get Wealth)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मेष


या राशीच्या लोकांना भौतिक सुखांबद्दल खर्चिक ठरणार आहे. मात्र शैक्षणिक कार्यात यश मिळणार आहे. तुम्हाला परदेश दौऱ्याची संधी मिळणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होणार आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. 


वृषभ


 वृषभ राशीच्या लोकांना गुरु पुष्य योग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी असणार आहे. या लोकांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. व्यवसायिकांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. या लोकांना धनलाभाचे योग आहेत. व्यवसायातून मोठा नफा मिळणार आहे. कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. 


मिथुन


वैदिक ज्योतिषात मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य योग खूप भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. नशिबाच्या चांगल्या पाठिंब्यामुळे अशक्य वाटणारी कामेही अगदी सहज मार्गी लागणार आहे. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अतिशय चांगला असणार आहे. तुमची बढती आणि पगारात वाढ दोन्हीही गोष्टी होणार आहे. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. बँक बॅलेन्स वाढल्यामुळे तुमची चिंता मिटणार आहे. 


सिंह 


सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य योग वरदानापेक्षा कमी नसणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या चांगल्या ऑफर मिळणार आहेत. समाजात त्यांचा चांगला मानसन्मान वाढणार आहे.  तुमच्या कामाचे आणि कल्पनांचे सगळ्या स्तरातून कौतुक होणार आहे. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. नवीन योजना तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Shani : 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, छप्पडफाड धनवर्षाव


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)