Guru Vakri 2023 / Amla Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या राशीतील स्थिती बदल्यामुळे कुंडलीत अनेक शुभ किंवा अशुभ योग तयार होतं असतात. अशात गुरुदेव आज दुपारी 4:58 वाजता मेष राशीत प्रतिगामी होणार आहे. बृहस्पतिच्या वक्री स्थितीमुळे अनेक राशींनी लाभ होणार आहे. ज्ञान, विवाह, धन, सौभाग्याचा कारक गुरुदेव मेष राशीत पॉवरफुल असा राजयोग तयार करत आहे. त्यामुळे तीन राशींच्या कुंडलीत धनलाभाचे योग तयार होत आहे. (guru vakri jupiter retro making amla yoga in mesh lucky for these 3 zodiac sign)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमला नावाचा हा राजयोग अतिशय शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रापासून दहाव्या भावात किंवा लग्नापासून दहाव्या घरात गुरु असतो तेव्हा अमला राजयोग निर्माण होतं असतात. 


मिथुन (Gemini Zodiac)


मेष राशीमध्ये गुरु वक्रीमुळे निर्माण झालेल्या अमला राययोगामुळे मिथुन राशीच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे. या लोकांना करिअरमध्ये हा राजयोग प्रगती आणि यश घेऊन आला आहे. विद्यार्थ्यांसाठीही योग अतिशय सकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. घरात धनसमृद्धीचे योग चालून आले आहेत. प्रदीर्घ प्रलंबित काम पुन्हा एकदा सुरु होणार असल्याने तुम्ही प्रसन्न असणार आहात. व्यवसायिकांसाठी हा राजयोग शुभ ठरणार असून कामातील अडथळे दूर होणार आहेत. 


सिंह (Leo Zodiac)


सिंह राशीमध्ये आधीपासून सूर्यदेव विराजमान आहे. त्यात आता गुरु वक्रीमुळे तयार झालेला अमला राजयोग हा सिंह राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना अतिशय लाभ होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुम्हाला अनेक कामांमध्ये मोठं यश प्राप्त होणार आहे. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालविणार आहात. 


मीन (Pisces Zodiac)


मीन राशीच्या लोकांसाठी अमला राजयोग अतिशय फलदायी ठरणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. व्यवसायात तुम्हाला अनेक आव्हाणांचा सामना करावा लागणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मुलाकडून कोणताही आनंदाची बातमी तुमच्या कानी पडणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Horoscope Money Weekly : 04 ते 10 सप्टेंबर : 'ही' मंडळी होणार मालामाल! शुक्र आणि गुरुचा स्थितीमुळे मिळणार मेहनतीचं फळ


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)