Horoscope Money Weekly : 04 ते 10 सप्टेंबर : 'ही' मंडळी होणार मालामाल! शुक्र आणि गुरुचा स्थितीमुळे मिळणार मेहनतीचं फळ

Weekly Career Horoscope 04 to 10 September : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. बालगोपाळ काही मंडळांना करणार मालामाल. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Sep 4, 2023, 07:09 AM IST
Horoscope Money Weekly : 04 ते 10 सप्टेंबर : 'ही' मंडळी होणार मालामाल! शुक्र आणि गुरुचा स्थितीमुळे मिळणार मेहनतीचं फळ title=
weekly money career horoscope 04 to 10 September 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy Dhan Yog and Guru Vakri and Shukra Margi 2023astrological predictions in marathi

Horoscope Money Weekly (04 to 10 September) : सप्टेंबर महिन्यातील आज पहिला सोमवार असून आज ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. आज शुक्र आणि गुरु आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा 04 to 10 तारखेपर्यंतचा आठवडा आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीकोनातून तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य...(weekly money career horoscope 04 to 10 September 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy Dhan Yog and Guru Vakri and Shukra Margi 2023astrological predictions in marathi)

मेष (Aries Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश आणि प्रगती घेऊन आला आहे. या आठवड्यात कामानिमित्त बाहेर गावी जाणं फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला अनेक सकारात्मक बदल दिसणार आहेत. तुमच्या आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होणार आहे. संपत्ती वाढ होण्याचे संकेत आहेत. आठवड्याच्या शेवटी तुमचा आदर वाढणार असून विरोधकांकडून तुमची प्रशंसा होणार आहे. 

शुभ दिवस : 4, 5, 6

वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती घेऊन आला आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. यशाचे मार्गाने तुम्ही शिखर गाठणार आहात. घरात सुख आणि समृद्धीचे नांदणार आहे. हा आठवडा तुम्हाला उत्पन्नापेक्षा अधिक खर्चिक ठरणार आहे. या आठवड्यात बाहेरगावी जाणं टाळा. आठवड्याच्या शेवटी जरा काळजी घ्या अन्यथा गैरसमज होतील. 

शुभ दिवस : 5, 6

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबींसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांचे बँक बॅलेन्स वाढणार आहे. भागीदारीतून केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. प्रवासातून यश मिळणार असल्याने मन प्रसन्न राहील. प्रवास यशस्वी करण्यासाठी एखाद्या स्त्रीची मदत होणार आहे. मात्र या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काळजी घ्या. काही समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. तुमच्या प्रकल्पाबद्दलही तुम्ही काळजीत असणार आहात. आठवड्याच्या शेवटी घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीमध्ये तुम्ही असाल. 

शुभ दिवस : 5, 6, 7

कर्क (Cancer Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी वेळ अनुकूल असणार आहे. प्रकल्पात तुम्हाला घवघवीत यश प्राप्त होणार आहे.  व्यावसायिक सहली तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहे. त्यामुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहणार आहे. मात्र आर्थिक स्थितीबद्दल थोड्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही केलेले प्रयत्न तुमच्यासाठी भविष्यातील अनेक सकारात्मक परिणाम घेऊन आलेला असेल. 

शुभ दिवस : 4, 5, 6

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जरा नरम गरम असणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचारपू्र्वक घ्या अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आर्थिक बाबातीत हा आठवडा निराशाजनक आहे. खर्चही वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणीही तुमच्या प्रकल्पाबाबत नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. या आठवड्यात प्रवास टाळा. अहंकारातून तुमचा संघर्ष वाढू शकतो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्या. 

शुभ दिवस : 5, 6

कन्या (Virgo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अच्छे दिन घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पामुळे तुमच्यावर कामाचा ताण वाढणार आहे. आर्थिक बाबतही काही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. या आठवड्यातील प्रवास टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम दिसणार आहेत. जीवनात आनंद आणि समृद्धी यांचा सुंदर योग तुम्ही अनुभवणार आहात. 

शुभ दिवस : 5, 8

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांची कामाच्या ठिकाणी यश आणि प्रगतीचा हा आठवडा आहे. तुमच्या समाजात मान सन्मानही वाढणार आहे. कुटुंबातही सुख आणि आनंदाचा अनुभव तुमचं मन प्रसन्न् करणारा असणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. या आठवड्यातील प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीतही हा आठवडा खूप भाग्यशाली सिद्ध होणार आहे. मात्र आर्थिक व्यवहारात अनावश्यक वादविवाद टाळा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही भविष्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार आहात. 

शुभ दिवस : 5, 7

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांना हा आठवड्यात कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. ज्या महिलेने आयुष्यात कठोर परिश्रम केले त्या महिलेकडून तुम्हाला प्रकल्पात मदत होणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये काही गोष्टींसाठी काळजी घ्या. तुम्ही संतुलन राखल्यास तुम्हाला आनंद होणार आहे. प्रवासातून मध्यम स्वरुपाचं यश प्राप्त होईल. त्यामुळे चांगल्या परिणामासाठी प्रवास पुढे ढकलणं योग्य ठरेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. वडीलधारी मंडळींशी तुमच्या वाद होण्याची भीती आहे. आठवड्याच्या शेवटी आरोग्याकडे लक्ष द्या. 

शुभ दिवस : 6, 7

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंददायी सिद्ध होणार आहे. कुटुंबातील सहकार्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचाही बेत तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. आरोग्याबद्दलही सकारात्मक परिणाम दिसणार आहे. तुम्ही फिट राहण्यासाठी पुढाकार घेणार आहात. जन्माष्टमी तुमच्या आयुष्यात आनंदी आणि सकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. प्रवासादरम्यान आळस सोडला तर तुम्हाला चांगला फायदा होईल. समजूतदारपणाने काम हाताळल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल. आर्थिक बाबींमध्येही तुम्ही गुंतवणुकीतून फायदा ोहणार आहे. 

शुभ दिवस : 5, 6, 7

मकर (Capricorn Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत.  तुमच्या सर्जनशील कार्यातून तुम्ही उंच आणि उंच शिखर गाठणार आहात. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम अधिक मजबूत होणार आहे. घरात लग्नाचं शुभ वार्ता होणार आहे. तुमच्या प्रियजनांच्या सहवासातून आनंदायी असा हा आठवडा असणार आहे. मात्र हा आठवडा खर्चिक असणार आहे. प्रवासातून फायदा होणार आहे. आठवड्याचा शेवट आनंदी आणि समृद्धी घेऊन येणार आहे. 

शुभ दिवस : 7,8

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीचे लोकांचा कामाच्या ठिकाणी हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. तुमचा आदर या वाढणार आहे. तुमच्या ऑफिसच्या सजावटीबाबतही तुम्ही अगदी मनापासून खरेदी करणार आहात. आर्थिक दृष्टीकोनातून हा आठवडा धनलाभाचा आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला पैसेच पैसे मिळणार आहेत. कामानिमित्त होणाऱ्या प्रवासातून तुम्हाला फायदा होणार आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे तुमचं मन अस्वस्थ असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचं संयमाने जीवनात यश मिळवणार आहात.

शुभ दिवस : 5, 6
 
मीन (Pisces Zodiac)

या आठवड्यापासून मीन राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी बरेच बदल दिसून येणार आहेत. तुमच्या कार्यशैलीतही अनेक बदल घडणार आहेत. हा आठवडा तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. या आठवड्यातील प्रवास तुम्ही टाळणं योग्य ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून होणारी मदत आनंदायी आणि सुसंवाद घेऊन येणार आहे. 

शुभ दिवस : 6, 8

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)