Hanuman Jayanti 2023 Shubh Muhurat in Marathi: हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सव हा मोठ्या थाट्यामाट्या साजरा केला जातो. संकटमोचन हनुमानजींच्या भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो. पवनपुत्र हनुमानजी यांची जयंती ही चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. त्यामुळे आज चैत्र पौर्णिमेचा दिवशी देशभरात बजरंगबलीची जयंती साजरी केली जाते आहे. (hanuman jayanti 2023 hanuman janmotsav 2023 date puja shubh muhurat significance tithi holiday panchang in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 


हनुमान जयंती 2023 पूजा शुभ मुहूर्त  (hanuman jayanti 2023 shubh muhurat)


हनुमान जयंती शुभ मुहूर्त जाणून घेऊयात. 


  • सकाळी 06:06 AM ते 07:40 AM

  • सकाळी 10:49 AM ते 12:23 PM

  • दुपारी 12:23 PM ते 01:58 PM

  • दुपारी 01:58 ते 03:32

  • संध्याकाळी 05:07 PM ते 06:41 PM

  • संध्याकाळी 06:41 PM ते 08:07 PM


हनुमान जयंती पूजा साहित्य 


पूजा चौकी, लाल वस्त्र, लाल लंगोट, पंचामृत, पाण्याचा कलश, जनेयू, सिंदूर, चमेलीचे तेल, गंगाजल, चांदी/सोन्याचे काम, अक्षत, चंदन, गुलाबाच्या फुलांच्या माळा, अत्तर, भाजलेले हरभरे, गूळ, नारळ, केळी, चुरमा, बनारसी पान, दिवा, अगरबत्ती, अगरबत्ती, कापूर, मोहरीचे तेल, तूप, तुळशीची पाने.


हनुमान जयंती 2023 पूजा विधी (hanuman jayanti 2023 puja)


  • सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. 

  • त्यानंतर हनुमानजींच्या समोर बसून त्यांचं ध्यान करा. 

  • आता आंब्याच्या पानाने हनुमानजींवर पाणी शिंपडा. 

  • हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. 

  • सिंदूर लावल्यानंतर बजरंगबलीला लाल फुलं अर्पण करा. 

  • याशिवाय अक्षत, सुपारी, मोतीचूर लाडू, लाल लंगोट अर्पण करा. 

  • हनुमान चालिसाचं पाठ करा. 

  • हनुमानजींना भोग म्हणून खीर अर्पण करा. 

  • या दिवशी सुंदरकांड आणि बजरंग बाण अवश्य वाचा. 

  • हनुमान मंत्रांचा जप करा आणि हनुमानजींची आरती करा.  

  • आता हनुमानजींच्या भोग प्रसादाचं सगळ्यांना वाट करा. 


हनुमान पूजा मंत्र


- ओम श्री हनुमते नम:
- ओम अंजनेय विद्महे वायुपुत्रय धीमहि । तन्नो हनुमत प्रचोदयात् ।
- मनोजवम मारुत्तुल्यवेगम जितेंद्रियम् बुद्धिमतम ज्येष्ठ. वातात्माजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये ॥
- 'ओम नमो भगवते हनुमते नमः'.
- 'ओम नमो हरि मरकत मरकतय स्वाहा।'


हनुमान जयंती 2023 चं महत्व


राम भक्तांसाठी हनुमान जयंतीचा दिवस खूप खास असतो. श्री रामाचा भक्त हनुमानजींच्या जयंतीला विधीवत पूजा केली जाते. शहर, गाव्यात मोठ्या मोठ्या मिरवणुका काढल्या जातात. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानजी हे आपल्या भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर करतात असा विश्वास आहे. म्हणून हनुमानजींना संकटमोचन म्हटलं जातं.


असं म्हणतात की, जो भक्त हनुमानजीची उपासना करतात ते भय, क्रोध, दु:ख, दोष मुक्त होतो. हनुमानजींची खऱ्या मनाने पूजा केली की आपल्याला दुहेरी म्हणजे रामाची आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते.  एक असं ही मान्यता आहे, म्हणजे शिवपुराणात असं म्हटलं आहे की, संकटमोचन हे भगवान शंकराचा 11वा अवतार आहे. 


हनुमान जयंतीला करा हे काम शनीची साडेसाती होईल दूर !(shani dev sade sati dhaiya negative effect hanuman puja)


धार्मिक ग्रंथानुसार,  शनिदेवाने हनुमानजींना वरदान दिले होते की जो बजरंगबलीची पूजा करतो त्याला त्रास देणार नाही. म्हणून जर तुमच्यावर शनि आणि धैय्याचा अशुभ प्रभाव असेल आणि तो टाळायचा असेल तर हनुमान जयंतीला ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. बजरंगबलीला सिंदूर रंगाचा लंगोट, लाल फूल, सुपारी आणि गूळ-चोरा अर्पण करा. नंतर कच्च्या खोबरेल तेलाच्या दिव्यात लवंग टाकून हनुमानजीची आरती करा. असं केल्यामुळे शनीच्या महादशापासून सुटका मिळते.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)