Holashtak 2023 Starting Date: यंदाची होळी कधी आहे याची माहिती तर तुम्ही करून घेतली. पण, यंदा होलाष्टक (Holashtak) कधीपासून सुरु होतंय याची तुम्हाला कल्पना आहे का? तुम्हाला अंदाजही नसावा, पण होळीच्या साधारण 8 दिवसांपूर्वी होलाष्टकास सुरुवात होते. यंदा हा काळ 27 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. सहसा हा कालावधी 8 दिवसांचा असतो. पण, यंदा मात्र तो 9 दिवसांचा आहे. परिणामी हा कालावधी 27 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत लागू असेल. अशी धारणा आहे की, या 9 दिवसांमध्ये कोणतंही शुभकार्य करु नये. अन्यथा संपूर्ण कुटुंबावर संकट ओढावू शकतं. तुम्हाला कल्पना आहे का या काळात नेमकं काय करावं आणि काय करु नये? 


होलाष्टक अशुभ.... पण असं का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात की, (Holi 2023) होळीच्या आधी आठ तिथी असतात. फाल्गुन शुक्ल अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा अशा त्या आठ तिथी. या सर्व तिथी अशुभ मानल्या जातात. पुराणकथांमध्ये उल्लेख केल्यानुसार हिरण्यकश्यपानं याच दिवसांमध्ये / तिथींमध्ये आपला पुत्र भक्त प्रह्लादाला मारण्यासाठी अनेक कटकारस्थानं रचत त्याला यातना दिल्या होत्या. त्याची विष्णूभक्ती हिरण्यकश्यपाला खुपत होती. त्यामुळंच हा काळ अशुभ मानला जातो. 


होलाष्टकात प्रकर्षानं टाळा 'या' गोष्टी 


ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) नमूद केल्यानुसार होलाष्टक (Holashtak 2023) हा असा कालावधी असतो ज्यामध्ये सहसा शुभकार्य केली जात नाहीत आणि करुही नयेत. या कालावधीत काही नातीसुद्धा घट्ट होत नाहीत. वडील- मुलगी, भाऊ- बहीण यांच्या नात्यात कटुता असल्यास ती या काळात कमी होत नाही.


हेसुद्धा वाचा : Holi 2023 : होळीच्या दिवशी करा 'हे' उपाय, आर्थिक, वैवाहिक बाबतीत होतील अनेक शुभ लाभ


 


होलाष्टकादरम्यान कोणत्याही नव्या कामाची सुरुवातही केली जाक नाही. असं करणं अशुभ असून, ते करणाऱ्या व्यक्तीला त्रासही होऊ शकतो. धर्माच्या आधारे अभ्यास करणाऱ्यांच्या मते या काळात मुंडन, (Grih Pravesh) गृह प्रवेश किंवा इतर कोणतंही शुभकार्य हाती घेऊ नये. 


होलाष्टकादरम्यान विवाहकार्यसुद्धा होत नाहीत. या दरम्यान लग्नकार्य टाळून एखाद्या शुभ प्रसंगी त्याचं प्रयोजन करावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे होलाष्टक काळात लेकिची किंवा सुनेची पाठवणी करु नका. यामुळं अशुभ परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. याचे परिणामही गंभीर असू शकतात. 


(वरील माहिती सर्वसामान्य मान्यता आणि धारणांर आधारलेली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )