Holi 2023 Panchang : आज होळी, पाहून घ्या शुभमुहूर्त आणि सावधगिरी बाळगण्याच्या वेळा
Holi 2023 Panchang : होळीच्या निमित्तानं एखादं शुभकार्य हाती घेण्याच्या विचारात आहात? आजचे काही योग आणि काही वेळा यामध्ये तुम्हाला मदत करतील. पाहा
Holi 2023 Panchang : आज होळी. वाईट प्रवृत्तींचा नाश करून एका नव्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहण्याचा संदेश देणारा हा सण. देशातील, राज्यातील विविध भागांमध्ये विविध पद्धतींनी होळी साजरी होत असतानाच आजच्या दिवसाच्या मुहूर्तांनाही तितकंच महत्त्वं आहे.
नव्या महिन्यातील नवा आठवडा सुरु झाला असून, या नव्या आठवड्यामध्ये तुम्हाला अनेक नव्य़ा संधी मिळणार आहेत. या संधींचं सोनं नेमकं केव्हा कराल, एखादं शुभकार्य केव्हा कराल या साऱ्याचे संकेत तुम्हाला पंचांगातून मिळणार आहेत. कारण, दैनिक राशीभविष्याला जितकं महत्त्वं प्राप्त आहे, तितकंच महत्त्वं या पंचागालाही प्राप्त आहे. (Holi 2023 panchang todays mahurat and significance )
आजचा वार - सोमवार
तिथी- चतुर्दशी
नक्षत्र - माघ
योग - सुकर्मा
करण- वाणिज, विष्टि
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:41 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.23 वाजता
चंद्रोदय - सायंकाळी 17.25 वाजता
चंद्रास्त - आज चंद्रास्त नाही
चंद्र रास- सिंह
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त– 12.56 पासुन 13.42 पर्यंत, 15.16 पासुन 16.03 पर्यंत
कुलिक– 15.16 पासुन 16.03 पर्यंत
कंटक– 09.02 पासुन 09.48 पर्यंत
राहु काळ– 08.09 पासुन 09.37 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 10.35 पासुन 11.22 पर्यंत
यमघण्ट– 12.09 पासुन 12.56 पर्यंत
यमगण्ड– 11.04 पासुन 12.32 पर्यंत
गुलिक काळ– 14.00 पासुन 15.28 पर्यंत
शुभ काळ
अभिजीत मुहूर्त - 12.09 पासुन 12.56 पर्यंत
विजय मुहूर्त- दुपारी 2.30 ते दुपारी 3.16
निशिता मुहूर्त- मध्यरात्री 12.7 पासुन 12.57 पर्यंत
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा
चंद्रबल- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)