मुंबई: मेष राशीच्या लोकांसाठी सोमवारची सुरुवात चांगली होणार आहे. कन्या राशीच्या लोकांना थोडे सावध राहावे लागेल. विनाकारण वाद कोणाशीही होऊ शकतात. खगोल गुरू बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया सोमवारचा दिवस आपल्यासाठी कसा असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: सोमवारी दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली होणार. हातात घेतलेलं काम पूर्ण होणार आहे. इतरांसोबत मिळून केलेल्या कामातही चांगला फायदा होईल. सकारात्मक विचार करा. 


वृषभ: सोमवारी आपलं भाग्य साथ देईल. कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग आहे. त्यांना चांगला पाठिंबा मिळेल. कुटुंबाकडूनच काही चांगली बातमी कळणार आहे.


मिथुन: कामाच्या दृष्टीने सोमवार तुमच्यासाठी चांगला. आर्थिक स्थिती चांगली राहील पण अचानक खर्चही वाढणार. मन प्रसन्न राहील. 


कर्क: कामाच्या ठिकाणी आपला दिवस सौम्य स्वरुपाचा राहील. सोमवारी तुम्ही मेहनतीने काम कराल आणि एखाद्याच्या मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील.


सिंह : नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सोमवारी कार्यक्षेत्रात चांगला दिवस जाईल.


कन्या : आरोग्याच्या दृष्टीने सोमवारी तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरी असो किंवा व्यवसायात चांगले यश मिळेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे


तुळ : सोमवारी विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत कोणाच्या तरी सहकार्याने काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. 


वृश्चिक : कामात चांगले यश मिळवून देणारा दिवस आहे, तुमची मेहनत आणि नशीब दोन्ही तुम्हाला साथ देणार आहे. 


धनु : ओळखीच्या लोकांसोबत दिवस चांगला जाईल. नवीन बिझनेस प्लॅनवर काम करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.


मकर: दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा मिळेल.


कुंभ: तुमच्या मेहनतीचे आणि अथक प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.


मीन: शुभकार्य घडेल, आपल्या गोड बोलण्याने फायदा होईल.