मुंबई : गुरुवारी सिंह राशीच्या लोकांमध्ये उत्साह दिसून येईल. त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांसोबत आज त्यांचं नशीब असणार आहे. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य कसं असणार आहे.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गुरुवारी नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. काही शुभ कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमचं बोलण्याने तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. कार्यक्षेत्रात तुम्हाला हवं तसं यश मिळेल.


वृषभ (Taurus)


गुरुवारी मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणतंही काम करताना ते समजून घ्या जेणेकरून अडचणी सोप्या होतील. तरुणांना करिअरमध्ये मोठं यश मिळ्ण्याची शक्यता आहे. 


मिथुन (Gemini)


या गुरुवारी नशीब तुमच्या सोबत आहे. कामात तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल.


कर्क (Cancer)


गुरुवारी प्रॉपर्टी डीलबाबतचा निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. तुम्ही कमावलेले पैसे सावधगिरीने खर्च करा. गाडी किंवा इतर कोणतंही वाहन चालवताना काळजी घ्यावी.


सिंह (Leo)


गुरुवारी तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे. नशीब तुमच्या सोबत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तींना भेटाल. 


कन्या (Virgo)


तुमचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. या गुरुवारी तुमची बुद्धिमत्ता आणि कामावरील निष्ठेचं कर्मचाऱ्यांकडून कौतुक होणार आहे. अनेक छोटी गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 


तूळ (Libra)


गुरुवारच्या दिवशी तुमच्या इच्छा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे चांगल्या लोकांशी चांगले संबंध राहतील. 


वृश्चिक (Scorpio)


गुरुवारी तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला कामात चांगला फायदा मिळणार आहे. दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली होण्याची शक्यता आहे. याशिवाय हातात घेतलेल्या कामात यश मिळेल.


धनू (Sagittarius)


गुरुवारी तुमचं आरोग्य सुधारणार आहे. तुमच्या घरी राहून तुम्ही बहुतांश कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी काळ कठीण असू शकतो, परंतु निराश होऊ नका. तुम्हाला सासरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळेल.


मकर (Capricorn)


गुरुवारी तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यावसायिक जीवनातील परिस्थिती तुमच्या इच्छेनुसार असेल. तुमच्या मित्रांना दिलेलं वचन पूर्ण करणं तुम्हाला सोपं जाईल.


कुंभ (Aquarius)


या गुरुवारी तुमचं काम हळू हळू चालेल. व्यवसायात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक करणं टाळावं. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे.


मीन (Pisces)


गुरुवारच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो.